ई-पीक पाहणी 2026 DCS APP द्वारे असं करा ऑनलाईन, Pik Pahani DCS App Maharashtra
नमस्कार शेतकरी मित्रांनो, Pik Pahani Maharashtra 2026-27 आता पीक पाहणी DCS MH या मोबाइल ॲपद्वारे करता येणार आहे.पूर्वीच्या मोबाइल ॲप खरीप पिकाचे ई-पीक पाहणी करता येत नाही सर्व काही अपडेट करण्यात आला आहे.शासनाने ई-पीक पाहणी खरीप 2026 करण्याकरिता सहाय्यक यांची निवड केले आहे,हे शेतकर्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक पाहणी करून DCS MH या द्वारे पीक पाहणी करतील. परंतु या मध्ये या मोबाईल ॲप मध्ये काही तांत्रिक बाबींचा अडचणी येत असल्याने शासनाच्या माध्यमातून पुन्हा शेतकरी लॉगिन सुरू करण्यात आला यावर्षी खरीप हंगामामध्ये कमी पावसामुळे बरेचसे पीक वाळून गेले आहेत.शासनाच्या माध्यमातून ट्रिगर एक दुष्काळ तालुके जाहीर करण्यात आले आहे शासनाच्या दुष्काळग्रस्त अनुदानाचा लाभ जर घ्यायचा असेल तर ई-पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे.
Pik Pahani Maharashtra 2026-27 :
ई-पीक पाहणी 2026 आपणास करावयाचे जमत नसेल आपल्या गावातील साहय्यक यांच्याशी संपर्क करून आपल्या शेतातील पिकांची ई-पिक पाहणी करून घ्या. डिजिटल क्रॉप सर्वे DCS MH या मोबाईलच्या माध्यमातून साहय्यक किंवा शेतकरी लॉगिन च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष आपल्या शेती पिकाची नोंद आपल्या उतारावर नोंद करता येतो आपण नोंद केलेले माहिती शासनाच्या विविध कृषी विषयक योजना लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाला उपयोगी पडणार
ई-पीक पाहणी 2026-27 करणाऱ्या सहाय्यक यांच्याकडून खालील प्रमाणे घटक ऑनलाईन केले जातील
- शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी करणे
- गट क्रमांक/सर्वे क्रमांकानुसार शेताची माहिती तपासणी
- खरीप हंगामातील प्रत्यक्ष शेती पिकाची पाहणी करणे
- शासनाच्या नवीन DCS MH या ॲप मध्ये नोंदणी करणे
- पिकाची नोंदणी झाल्याची खातर जमा करून शेतकऱ्यांना माहिती देणे
- गावातील सर्व शेतकऱ्यांचे दिलेल्या कालावधीमध्ये डिजिटल स्वरूपात ई-पीक पाहणी करणे
ई-पीक पाहणी 2026-27 कालावधी :
शेतकरी मित्रांनो ई-पीक पाहणी 2026 चा सुरुवात 11 ऑगस्ट 2026 रोजी झाला,याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2026 आहे सहाय्यक च्या माध्यमातून ई-पीक पाहणी महाराष्ट्रात पूर्ण केली जाणार, या आत मध्ये काही अडचणी येत असल्यामुळे पुन्हा शेतकरी स्तरावरील पीक पाणी सुरुवात 11 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आला. त्यामुळे 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ही पीक पाणी करून घ्यावे.
ई-पीक पाहणी 2026 केल्यानंतर आपण जे काही पीक विमा वगैरे भरलेले आहे त्याचा लाभ घेणे शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या विविध अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.
