राज्यात नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये सुरू होणार,New Start Upper Collector Office in Maharashtra

नमस्कार मित्रांनो,राज्यातील नागरिकांना प्रशाकीय कामे जलद गती व्हावे याकरिता शासनाच्या कामाच्या पद्धती मध्ये वारंवार बदल केले जातात.आता महाराष्ट्रात प्रमुख चार जिल्हामध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे .

पुणे जिल्हा मध्ये बारामती ,सोलापूर मध्ये पंढरपूर ,रत्नागिरी मध्ये दापोली ,नागपूर मध्ये नागपूर ग्रामीण असे प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये सुरू होणार आहेत.या नवीन कार्यालये मुळे नागरिकांना प्रशासकीय सेवा ही सुलभ व गतिमान मिळणार आहेत. महसूल विभागावरील कामाचा लोड पण कमी होणार,शेतकर्‍याच्या कामे पण मार्गी लागणार ,एखाद्या कामाकरिता होणारे हेलपाटे कमी होणार .

शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे जिल्हातील नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा व विविध योजना लाभ हे सुलभ आणि जवळच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. पंढरपूर नवीन अप्पर जिल्हाधिकारी शासनाने मान्यता दिले असून सोलापूर व पंढरपूर हे दोन्ही कार्यालये निश्चित करण्यात आले.

नवीन रचनेसुसार पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ,पंढरपूर ,माळशिरस,माढा ,करमाळा ,सांगोळा,मोहोळ,आणि मंगळवेढा हे सात तालुके समाविष्ट असणार आहेत तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दक्षिण सोलापूर ,उत्तर सोलापूर,बार्शी,अक्कलकोट ,अप्पर तहसिल मंद्रूप इत्यादी समिविष्ट असतील . प्रशासकीय कामकाजाचे विलगीकरण होऊन सेवा अधिक सुलभ व गतीमान करण्याच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *