रासानिक खतासाठी करावे लागणार बुकिंग,असं करा ऑनलाईन Framework for Fertilizer Sale App Online
नमस्कार शेतकरी मित्रांनो, बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनाही बदल व्हावे लागेल कारण यापुढे आता शेती करता मिळणारे रासायनिक खत हे अगोदरच बुकिंग करावे लागणार, खरीप व रब्बी हंगामामध्ये आपण ई-पीक पाहणी करावे लागणार उतारावर जे पीक दिसेल त्या प्रमाणे आपल्याला रासायनिक खते उपलब्ध होणार आहेत, ते शेतकऱ्यांकरिता प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करणे आवश्यक, पुढील महिन्यापासून या रासायनिक खताचा नवीन नियम महाराष्ट्र मध्ये सर्वत्र लागू होणार त्याकरिता एक मोबाईल ॲप निर्मिती करण्यात आला आहे.FWFS FRAMEWORK FOR FERTILIZER APP त्याच्या माध्यमातून आता आपणास कोणते खते खरेदी करावयाचे आहे त्याची अगोदरचं App माध्यमातून बुकिंग करावे लागणार.
फ्रेमवर्क फॉर्म फर्टीलायझर सेल, या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने आपणास बुकिंग करता येणार, यामुळे आपणास दुकानात जाऊन रांगेत उभे राहावे लागणार नाही कधी कधी शेतकऱ्याला कोणते खत हवे असतील ते खते मिळेल की नाही याची खात्री नसते, पण या ॲपमुळे आपणास खते मिळणार की नाही याची खात्री होणार, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अनावश्यक फेरा हेही थांबणार.
फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल या मोबाईल आणि सी एस सी च्या माध्यमातून ही रासायनिक खताचे बुकिंग करता येणार तुम्ही बुकिंग केलेले खत तुमच्यासाठी राखीव असेल दुकानात जाऊन फक्त किंवा आर कोड दाखवून तुम्ही खते घेऊ शकता.
खते खरेदीचे पद्धत :
- प्रथमता मोबाईल मध्ये फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल मोबाईल ॲप डाऊनलोड करा,
- शेतकरी नोंदणी करा आधार कार्ड पडताळणी करून नोंदणी कन्फर्म करा.
- पीक आणि खताची निवड करा तुम्ही घेणारे योग्य खतांची निवड करून पुढे जा.
- खताची विक्रेती करणारा रिटेलर अथवा दुकान निवडा दुकान निवडल्यानंतर त्या खत दुकानदार कडे तुम्ही घेत असलेले खत उपलब्ध आहे की नाही ते दाखवेल.
- तुम्हाला शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे या ॲप मध्ये संपूर्ण जिल्ह्यातील तुम्ही घेत असलेल्या खताची सर्व विक्रेत्यांचे यादी तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने बुकिंग केल्यानंतर,
- तुम्ही बुकिंग केलेला घटकांची एक किंवा आर कोड आणि टोकन तयार होईल तो टोकन दुकानदारांना दाखवून तुम्ही खते घेऊ शकता.
शेतकरी मित्रांनो तुम्ही बुकिंग केलेले टोकन किंवा क्यूआर कोड हे किमान दोन ते तीन दिवसांकरिता वैद्य राहतील.
या मोबाईल ॲपमुळे शेतकऱ्यांना वेळेची बचत व जवळच्या दुकानात खत उपलब्ध असलेले ची निश्चित माहिती प्राप्त होणार आहे, आधुनिक पद्धतीने आणि पारदर्शक किमतीमध्ये हे रासायनिक खते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार.
अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी खालील पोस्टाचा उपयोग करा











सौजन्य : मास्टर ट्रेनर्स ,सुशांत लव्हटे ,संभाजी शेणवे धन्यवाद .
