राज्यात 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर,हे उपाययोजना व सवलती लागू Maharashtra Trigger-1 Dushkal Jahir

नमस्कार,या वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवाती पासूनचं पाऊस कमी पडत होता.तरी पण शेतकर्‍यांनी पुढे पाऊस होईल म्हणून खरीप पिकाची पेरणी केले पण पीक जोमत वाढ होत असताना पावसानी एका महिनाच्या खंड घेतला महाराष्ट्रातील उभा पीक पाण्याविना वाळण्यास सुरुवात झाले,या सर्व गोष्टी विचार करून सरकारने एकूण 265 तालुक्यात खरीप 2026 हंगामातील पावसाची तूट आणि अन्य घटकामुळे निर्माण समस्या करिता काही उपाययोजना व सवलती लागू केले आहे.

Trigger-1 Dushkal 2026 Jahir :

दुष्काळ करिता शासनाचा काढून महत्वपूर्ण GR प्रसिद्ध करण्यात आला आहे सन 2026 च्या खरीप हंगामातील Tigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या 265 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करणेबाबत.राज्यातील 265 तालुक्यात जून ते सप्टेबर पर्यंत च्या कालावधी मध्ये पावसाची कमी व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती असल्याचे अहवाल आयुक्त कृषि यांनी सादर केला ,

शासनाकडून Tigger-1 (प्रथम कळ) लागू असलेल्या तालुक्यांमध्ये जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.Tigger-1 265 तालुक्यात लागू असल्याने त्या तालुका करिता परीशिष्ट-1 मध्ये नमूद असलेल्या दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य शासनाकडून विशेष बाब आणि खालील उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दुष्काळ 2026 मध्ये असलेले उपायोजना व सवलती

1)जमीन महसुलात सूट

2) पीक कर्जाचे पुनर्गठन

3) शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती

4) कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट ( 7.5hp पर्यंत क्षमतेचा विजय पंपाचा वीज बिल अगोदरच माफ करण्यात आलेला आहे त्यावरील वीज पंपाचा सदर सूट लागू असेल )

5) शालेय /महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेत शुल्कात माफी

6)रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे.

7) राज्यात आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर चा वापर करणे.

8) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांना शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

9) शेतीवर आश्चित शेतकरी मजुरी इत्यादी अन्नधान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे

10) जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे.

11) जलसंधारणाची कामे सुरू करणे.

12) अगोदरच निर्मिती निर्गमित करण्यात आलेल्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे पिण्याची पाणी आणि जनावरांसाठी पाणी नियोजन करणे.

अशा पद्धतीने शासनाकडून सदर 265 तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुसकाने बाबत मदत व विविध कार्यपद्धतीची पूर्ववत करून स्वतंत्र शासन निर्णय 25 सप्टेंबर 2026 ला GR जाहीर करण्यात आलेला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *