MahaDBT Farmer Beneficiary List 2026 ,फॉर्म भरलेल्या सर्व शेतकर्‍यांना मिळणार औजार खरेदी संहमतीपत्र!

MahaDBT Farmer Anudan List 2026 :

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यातील खूप सारे शेतकरी बांधव महा-डीबीटी पोर्टल वर विविध औजार करिता अर्ज केले आहेत.त्यामध्ये कृषी यांत्रिकरण मधील साहित्य,सिंचन साधने,इत्यादी.पण खूप दिवस झाले कोणत्याचं शेतकर्‍यांना लॉटरी लागलेल नाही सर्व शेतकरी प्रतिक्षेत आहे,पण शेतकरी मित्रांनो आता लवकरचं सर्वांना आपण केलेल्या साहित्य खरेदी करिता सहमती पत्र मिळणार आहे .

Maha DBT New Portal :

दिनांक ०५ नोव्होबर २०२६ रोजी कृषी विभाग महाराष्ट्र शासन,संचालक कृषी अभियांत्रिकी संचालनालय,कृषी आयुक्तालय पुणे,मार्फत परिपत्रक काढण्यात आलेला आहे. त्याचा महत्त्वाचा विषय,कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत सन 2025-26 तसेच 2026-27 मधील लाभार्थ्यांना पूर्वसमिती प्रदान करण्याबाबत आहे. शेतकऱ्याने विविध योजना अंतर्गत साहित्य खरेदीसाठी भरलेले फॉर्म मंजूर करून त्यांना औजार खरेदी करण्यासाठी पूर्वसमिती देण्याकरिता माननीय सचिव कृषी विभाग यांच्यासोबत 29 सप्टेंबर 2026 रोजी ऑनलाइन बैठक झाली होती.

राज्यामध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना,कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प या योजना महाडीबीटी पोर्टल द्वारे राबविले जात आहेत.सन 2025-26 अंतर्गत कृषी आंत्रिकीकरण सर्व पूर्वसमिती प्रदान करण्यात आलेले आहे तरी उर्वरित सर्व प्रलंबित अर्जां ची पूर्वसमिती तात्काळ निर्गमित करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आपले स्तरावर सूचना देण्यात यावे अशा पद्धतीचे सूचना या परिपत्रकाच्या माध्यमातून सर्व कृषी विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

यामुळे जे शेतकरी कोणत्याही योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला आहे त्यांना लवकरच लॉटरी लागणार आहे लॉटरीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना विहित दिलेल्या औजार खरेदी करून देय रकमेची पावती अपलोड करावे लागणार आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही योजनेअंतर्गत फॉर्म भरला असेल तर आजचं महाडीबीटी पोर्टल वरती आपलं फॉर्म लॉगिन करून स्टेटस चेक करा.इतर हा पोस्ट जर आपल्या आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *