जिल्हा परिषद कृषि विभाग मार्फत या औजारांना मिळणार ५० % अनुदान | ZP Solapur Krushi Vibhag 2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यातील जिल्हा परिषद मार्फत शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी शेती औजार घेण्यासाठी विशिष्ट अनुदान दिलं जात (solapur zp member list),जिल्हा परिषद प्राप्त निधीतून कृषी विभागासाठी निधी राखीव असते त्याचं निधीतून शेतकर्‍यांना औजार घेण्यासाठी अनुदान दिलं जात आज या लेखात आपण जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सन २०२४-२५ मधील कृषी औजार घेण्यासाठी जे ५० % अनुदान दिलं जाणार आहे ,(zp solapur)त्यात कोणते शेती संबंधित औजार आहेत आणि किती निधी प्राप्त होणार या बदलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

कृषी विभाग जिल्हा परिषद सोलापूर :

जिल्हा परिषद मार्फत खलील योजना मधील शेती संबधित औजारसाठी अनुदान दिलं जात .
  1. पीक संरक्षण औजार/उपकरणे
  2. ट्रॅक्टर चलित औजार
  3. कृषी सिचांनासाठी सुधारित औजार साधने पुरविणे
  4. सुधारित औजार पुरवठा

आवश्यक कागदपत्रे :

  • जमिनीचा चालू ७/१२. ८अ
  • लाभार्थी आधार कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँक पासबूक
  • ट्रॅक्टर औजारसाठी ट्रॅक्टर RC
  • अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती लाभार्थी असल्यास जात प्रमाणपत्र 
  • दिव्यांग लाभार्थी असल्यास प्रमाणपत्र 

फॉर्म भेटण्याचं ठिकाण :

 पंचायतसमिती कृषी विभाग,हे ५० टक्के मर्यादित अनुदानावर DBT (डीबीटी) तत्वावर देण्यात येणार आहे ,या योजनेमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती तसेच अल्पभूधारक व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहणार .जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकर्‍यांना सोलार इंसेक्ट ट्रप,नि पिस्टन स्प्रे ,बॅटरी स्प्रे पंप, ब्रश कटर,ट्रॅक्टर रोटाव्हेटर ,पल्टि नांगर ,रोटरी टिलर व विडर ,पेरणी यंत्र ,कल्टि व्हेटर ,५HP सबमर्सिबल पंप संच ,डिझेल इंजिन ,कडबाकुटी ,ताडपत्री ,स्लरी इत्यादि शाधने यातून शेतकर्‍यांना प्राप्त होणार आहे . 

महत्वाचे टीप :

इच्छुक शेतकर्‍यांनी वरील सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रती तयार करून संबधित पंचायत समितीकडे अर्ज सादर करावे ,या ठिकाणी सादर करण्या अगोदर आपल्या ग्रामपंचायत मध्ये चौकशी करून माहिती घ्यावी तसेच साहित्य खरेदी करताना रोखीने न करता ,बँकेतून DD,किंवा RTGS ने करावे. औजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येणार व मंजूर औजाराची अनुदान संबधित शेतकर्‍याच्या आधार लिंक असलेल्या बँक खाते मध्ये DBT प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार .

अर्ज करण्याची शेवटी तारीख : –  

शेतकर्‍यांनी आपल्या तालुक्यातील संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज दिनांक ०५ऑगस्ट २०२४ पर्यंत जमा करावे असे आवाहन कृषि विभाग सोलापूर जिल्हा परिषद मार्फत करण्यात आला आहे .

औजार चे संपूर्ण तपशीलसाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top