Vishwakarma Yojana :-
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत देशातील ३० लाख कुटुंबांना याचं थेट फायदा होणार. प्रत्येक कौशल्याचा बेसिक आणि ऍडव्हान्स असे दोन प्रकार मध्ये कौशल प्रशिक्षण हे दिले जाणार आहे.५.२५ लाख तरुणांना मिळणार नवीन कौशल्याचा ज्ञान,विश्वकर्मा योजनेअंतर्गत अवघ्या ५ ट*क्के व्याजदराने लाखभर कर्ज मिळणार. योजना मिळवण्यासाठी काय करावे लागेल. पात्रता काय यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. महत्त्वाचा पोस्ट शेवटपर्यंत वाचा .
Pm Vishwakarma Yojana :
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) ने रविवारी १७ सप्टेंबर २०२३ रोजी आपल्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त देशातील सर्व लोकांना खूप मोठा भेट दिलेत. पीएम विश्वकर्मा योजना (Pm Vishwakarma Yojana)सुरुवात झाल्याची घोषणा केले.या योजनेच्या १३००० करोड रुपये पारंपारिक कौशल्या अंतर्गत काम करणारे कारागीर यांना आपले व्यवसाय करण्यास मदत होणार, यामध्ये प्रशिक्षणासोबत लाभार्थ्यांना ०२ भागांमध्ये ०३ लाख रुपये पर्यंत कर्जही दिले जाणार. या योजनेमुळे आपली व्यवसाय सुरू करणार्यास आर्थिक मदत होणार.
विश्वकर्मा योजना काय ?आहे :-
प्रथमता हे समजून घ्या विश्वकर्मा योजना काय आहे, या योजनेअंतर्गत सोनार,लोहार,नाव्ही आणि चर्मकाम करणारे तसेच पारंपरिक कौशल्य वर काम करणाऱ्या असे अनेक कारागिरांना याचा फायदा मिळणार.केंद्र शासनाच्या अंतर्गत देशांमधील एकूण १८ पारंपरिक कौशल्या वर आधारित व्यवसायाचा समावेश करण्यात आला आहे.यामुळे भारतातील ग्रामीण व शहरी भागातील कारागीर आणि शिल्पकार यांना मदत होईल .यामध्ये कार्पेंटर,नाव बनवणारे ,लोहार,सुतार काम ,कुंभारकाम अशा अनेक साहित्य तयार करणाऱ्या मूर्तिकार,गवंडी काम करणारे ,मासेमारी व्यवसायासाठी जाळी तयार करणारे ,लाकडी पासून खेळणी साहित्य बनवणारे या सर्वांचा समावेश या विश्वकर्मा योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे.
दोन भागांमध्ये तीन लाखापर्यंत चा कर्ज :-
भारतातील कोणत्याही नागरिकाला स्वतःचा व्यवसाय सुरू इच्छा असेल अशा नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने या योजनेअंतर्गत कर्ज प्राप्तीसाठी अर्ज करू शकतात योग्य कागदपत्रे असल्यास तीन लाख रुपये पर्यंतचा प्रथम कर्ज त्यांना दिला जातो. व्यवसायाच्या सुरुवातीच्या पहिल्या चरणामध्ये एक लाख रुपयाचा कर्ज त्यानंतर व्यवसाय विस्तारीकरण झाल्यानंतर दोन लाख रुपयांचा कर्ज व्यवसाय धारकांना घेता येतं. हे कर्ज अत्यंत सवलतीच्या ५ ट*क्के दराने दिले जाते.
विश्वकर्मा योजना प्रशिक्षण बरोबर दररोज मानधन :-
प्रधानमंत्री यांच्या माध्यमातून सुरू केलेला विश्वकर्मा योजने (Pm Vishwakarma Scheme)अंतर्गत एकूण १८ पारंपारिक व्यवसायाचा कौशल्य प्रशिक्षण, प्रशिक्षण केंद्रामध्ये दिल जाणार प्रशिक्षण घेताना प्रशिक्षणार्थीला प्रत्येक दिवशी ५०० रुपये मानधन दिला जाणार. त्यासोबत पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट आणि आयडी कार्ड त्याचबरोबर त्या संबंधित बेसिक माहिती तसेच ॲडव्हान्स ट्रेनिंग दिल जाणार व्यवसायामध्ये महत्त्वाचा लागणारे १५ हजार रुपये पर्यंतचे टूलकिट ही प्रशिक्षणार्थीला दिला जाणार.
विश्वकर्मा योजना पात्रता:-
- तो भारतीय नागरिक असावा.
- केंद्र शासनाने निवडलेले १८ पारंपारिक व्यवसाय संबंधित व्यवसाय असावे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीची वयोमर्यादा १८ ते ५० वर्षाच्या दरम्यान असावे.
- कर्ज प्राप्तीसाठी मान्यताप्राप्त संस्थानांमध्ये प्रशिक्षण घेतलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी १४० प्रकारच्या व्यवसाय मधील एकाशी संबंधित असणे आवश्यक.
योजनेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे :-
- आधार कार्ड,
- पॅन कार्ड,
- उत्पन्न दाखला,
- जातीचा प्रमाणपत्र,
- इतर ओळखपत्र,
- रहिवासी प्रमाणपत्र,
- पासपोर्ट साईज फोटो,
- बँक पासबुक,
- सद्यस्थितीला चालू असलेला मोबाईल क्रमांक
Vishwakarma Yojana Online Application :-
- प्रथमता अधिकृत वेबसाईट https://pmvishwakarma.gov.in/ओपन करा.
- त्या ठिकाणी pm vishwakarma kaushal samman yojana योजना दिसेल.
- त्या ठिकाणी Apply Online या पर्यायाला क्लिक करा.
- या ठिकाणी विचारलेली सर्व माहिती भरा.
- त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांक वरती रजिस्टर नंबर आणि पासवर्ड प्राप्त होईल.
- मिळालेला युजर आयडी पासवर्ड च्या साह्याने रजिस्टर लॉगिन करा.
- विचारलेला प्रत्येक मुद्देची माहिती व्यवस्थित पूर्णपणे भरून योग्य ते कागदपत्रे अपलोड करा.
- आपण भरलेली सर्व फॉर्म व्यवस्थित भरल्याचा खातर जमा करून शेवटी सबमिट बटणावर क्लिक करा.