नवीन विहीर,जुनी विहीर,इनवेल बोअरिंग बर्‍याचं घटकासाठी अनुदान मिळणार ! Vihir Anudan Yojana Maharashtra

Vihir Anudan Yojana :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,महाडीबीटी च्या माध्यमातून विविध घटकासाठी अनुदान दिले जाते त्यामधील एका महत्वपूर्ण योजने बदल माहिती आज च्या लेखात घेणार आहोत,अनुसूचीत जातीतील शेतकर्‍यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेती सुधारण्याकरिता शासनाच्या माध्यमातून अडीच लाखापर्यंत अनुदान दिले जाते.

या सर्व घटकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावं लागतो या विशिष्ट घटकासाठी सोडून इतर कोणत्याही शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करावा लागतो.

डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी आहे.अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आहे.या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरती या घटकाची निवड करून खालील घटकाची असलेला अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

अनुदानित घटक  :-

नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, वेल बोरिंग पंप संच, विज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण,सूक्ष्म सिंचन संच ,ठिबक संच, तुषार संच,  परसबाग ,पीव्हीसी पाईप इत्यादी.

मिळणारे अनुदान :-

  • जुनी विहीर दुरुस्ती ५०००० रु .
  • नवीन वीर अडीच लाख रुपये
  • इनवेल बोरिंग २०००० रुपये
  • पंप संच २०००० रुपये
  • विज जोडणी आकार १०००० रु.
  • शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण ०१ लाख रुपये
  • ठिबक सिंचन ५० हजार रु , तुषार सिंचन २५०००रु, परसबाग ५०००रु
  • पीव्हीसी पाईप ३० हजार रुपये.

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी सविस्तर माहितीसाठी आपल्या कृषी अधिकारी यांना संपर्क साधू शकता.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *