आता करा घरबसल्या 7/12 वर वारस नोंद | Varas Nond Online

Varas Nond Online :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी सहज रित्या ७/१२ वर वारसांची  नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करता येणार आहे. वडिलोपार्जित घर,जमिनीसाठी वारस नोंद करावयाची असल्यास यापुढे तलाठी कार्यालयास जाण्याची गरज भासणार नाही.   land record

शासनाच्या माध्यमातून त्या पद्धतीचा ऑनलाईन प्रणाली आता नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख  विभाग अंतर्गत आतापर्यंत डिजिटल सातबारा, ई फेरफार, तसेच ई-पीक पाहणी, अशा शेतकरी उपयोगी ऑनलाइन प्रणाली विकसित केलेले आहे.

Varas Nond Online :-

या सर्व ऑनलाईन पद्धतीच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. एखाद्या कामामुळे वारंवार होणाऱ्या तलाठी कार्यालयाचे हेलपाटे शेतकऱ्यांचे कमी झालेत . bhumi abhilekha

वाढत्या इंटरनेटच्या जगतामध्ये या ऑनलाईन प्रणालीचा वापर जास्त प्रमाणात होत असल्याने शासनाच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

 वारस नोंद ऑनलाइन प्रणाली वापरायची कशी ?

  • आपल्या मोबाईल ब्राउझर मध्ये https://pdeigr.maharashtra.gov.in/
  • हा संकेतस्थळ ओपन करा.
  • या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करा.
  • संबंधित अर्ज गाव पातळी तलाठी यांच्या लॉगिनला जाईल.
  • सदर अर्जाची तलाठीमार्फत पडताळणी करतील.
  • कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला मेल द्वारे मिळणार
  • जर सदर दिलेली माहिती संपूर्ण बरोबर असेल त्याची नोंद ७/१२ उतारा वर करण्यात येईल.

राज्यामध्ये ही प्रणाली ०१ ऑगस्ट २०२३ पासून लागू करण्यात आली आहे .शासनाच्या माध्यमातून पुढील टप्प्यांमध्ये कर्जाचा बोजा दाखल करणे, कमी करणे अन्य सुविधा ई-हक्क प्रणाली द्वारे उपलब्ध करून देणार आहेत.

एका सर्वेनुसार राज्यामध्ये एका वर्षामध्ये ३०००० वारस नोंद होतात .

ऑनलाईन वारस नोंद

करण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top