UPI पेमेंट मध्ये १ जानेवारी पासून कोणते बदल ?जाणून घ्या..UPI Transaction Limit Per Day
UPI Transaction Limit Per Day :-
नमस्कार मित्रांनो ,देशात सध्या UPI चे ४० कोटीपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत हे सगळे Online Payment करतात.आजकाल ऑनलाईन पेमेंट संबधी खूप फसवणूक होत आहेत .अश्या फसवणुकीचे गुन्हे वाढतात त्यासाठी भारत सरकार GOVT या Cyber Frauds संदर्भात कठोर निर्णय घेतलं .भारत सरकार आणि RBI ने अश्या गोष्टी थांबवण्यासाठी UPI Payment चे सर्व नियम बदल करण्याचे ठरविले आहे . आता पर्यंत आपण कोणतेही ठिकाणी UPI Payment केले असता ते काही क्षणात पुढील पार्टीला जमा व्हायचं .
पण आता १ जानेवारी २०२४ दोन हजार रुपये पुढील UPI Payment समोरच्या व्यक्तिला ४ तासांनी जमा होणार ,आपण काही वस्तु खरेदी केलात आणि बिल २००० रुपये पेक्षा जास्त असेल तर दुकानदार पैसे जमा झाल्यावर वस्तु देणार अशी स्थिती निर्माण होणार .पोस्ट मध्ये या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तरी पूर्ण वाचा .
UPI Transfer New Rules :-
- UPI Payment केलेले पैसे जमा होण्यास ४ तासाचा वेळ लागणार .
- २००० रुपये पर्यंत पेमेंट जमा होणार लवकर .
- दोन हजार वरील UPI Payment ला लागणार वेळ .
- नवीन upi जर ओपन केलात तर २४ तासात फक्त ५००० रुपये पाठवता येणार
- तुम्ही जर चुकीच्या व्यक्तींना पैसे पाठवलं असेल तर ते ४ तासात परत मिळवता येण
UPI चा इतिहास आणि वर्तमान :-
०१ जानेवारी २०२४ पासून महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि हे बदल करणं आरबीआयला का गरजेचं ते पहा.सन २०२३ या वर्षामध्ये ४० कोटी रु.नोव्हेंबरपर्यंत UPI च्या माध्यमातून झालेली जी ट्रांजेक्शन आहेत हे सर्व ११ बिलियन यूपीआय द्वारे २०२३ या वर्षात झालेले जे व्यवहार आहेत .
या अंतर्गत एकूण १६ लाख कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त सायबर गुन्ह्यांमध्ये चोरी ३0,000 करोड रुपये फसवणूक झाला आहे .१०० बिलियन ट्रांजेक्शन आकड्यांवरून सायबर गुन्हेगारांकडून यूपीआय च्या द्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीची रक्कम आहे ती खूप मोठी आहे आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आरबीआयने हे बदल केलेले आहे.
UPI Payment नवीन बदल : –
- यूपीआय पेमेंट फोन मध्ये जर का तुम्ही जर ॲप इन्स्टॉल केलेले असतील आणि जानेवारी ते डिसेंबर २०२३ या एक वर्षाच्या काळात जर एकदाही तुम्ही वापर केला नसेल.
- तर ०१ जानेवारी २०२४ पासून Mobile App लॉक करून सुरक्षिततेच्या कारणास्तव सस्पेंड केली जातील.
- नंबर दोन पेमेंट लिमिट म्हणजे डेली पेमेंट लिमिट जास्तीत जास्त एक लाख रुपये आता असणार आहे .
- स्पेशल पेमेंट लिमिट फक्त हॉस्पिटल्स आणि शैक्षणिक संस्था यांना एक दिवसासाठी जास्तीत जास्त पाच लाख रुपये लिमिट असणार आहे.
- आता हॉस्पिटल किंवा शाळा कॉलेजेस फी रक्कम असणार आहे ट्रांजेक्शन पाच लाख रुपयांपर्यंतची असेल ५ लाख रुपयांपर्यंतची फी आता यूपीआय द्वारे तुम्हाला भरता येऊ शकते .
- आतापर्यंत ट्रांजेक्शन झालं की लगेचचं विक्रेत्याच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे पण आता जानेवारी २०२४ पासून तुम्ही कोणत्याही नवीन व्यक्तीला किंवा शॉप ला किंवा ऑनलाईन जर तुम्ही काय खरेदी केली असेल २००० रु पेक्षा जास्त रक्कम यूपीआय पेड केली असेल,
- अकाउंटला ती रक्कम जमा होण्यासाठी चार तास लागणार आहेत .
- पण तुम्ही त्या व्यक्ती किंवा दुकानदाराला नेहमी म्हणजे जर तुम्ही फ्रिक्वेन्सी यूपीआय द्वारे जर तुम्ही पेमेंट करत असाल तर हा नियम तुम्हाला लागू होणार नाहीये.
- यूपीआय द्वारे नवीन व्यक्तीना केलेलं पेमेंट चार तासाच्या आत तुम्ही ते कॅन्सल करू शकणार आहात .
- कॅन्सल केलेल्या ट्रांजेक्शन पेमेंट मूळ बँक खातेत जमा होणार
UPI Transfer New Rules फायदे व तोटे :-
- सायबर गुन्हेगारांनी चोरलेली रक्कम परत मिळवण्यासाठी होईल किंवा चुकून दुसऱ्याच्या अकाउंटला जर का पैसे गेले असतील तर असं पेमेंट लगेचच परत हे मिळू शकणार आहे .
- यूपीआय द्वारे पैसे पाठविलात तर तुम्ही खरेदी केली तर दुकानदार त्या वस्तूची त्या खरेदी केलेल्या वस्तूची डिलिव्हरी आहे ती चार तासाने तुम्हाला देईल कारण चार तासात तुम्ही ट्रांजेक्शन कॅन्सल करू शकता आणि हे त्यालाही माहिती असेल त्यामुळे तो रिस्क घेणार नाही .
- जेवायला गेला तर बिल २०००रु पेक्षा जास्त झालं तर हॉटेल मालकांस डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरावा लागेल .
- आता विक्रेत्याचा खरं नाव डिस्प्ले होणार आहे .
- आता तुम्ही विनंती करू शकता आणि शिल्लक जास्त रक्कम खर्च म्हणजे तुमची बँक तुमचं ट्रॅक रेकॉर्ड सिबिल स्कोर चेक करून ही फॅसिलिटी ओव्हर ड्राफ्ट किंवा सीसी सारखी तुम्हाला देऊ शकते.
- आरबीआयने जपान मधील हिताची कंपनी बरोबर संयुक्त ही ATM मशीन आहेत ही सगळीकडे उपलब्ध होणार आहेत जसे डेबिट आणि क्रेडिट कार्डस व्याप करून एटीएम मधून तुम्ही कॅश काढू शकता तसेच आता यूपीआय क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही या मशीन वरून कॅश तुम्हाला काढता येणार आहे .
- यूपीआय ट्रांजेक्शन क्रेडिट लिमिट वापरून किंवा क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय बॅलेट मध्ये पैसे जमा केलेले असतील म्हणजे आता फक्त ही सुविधा आहे ही पेटीएम ला उपलब्ध आहे पण असं जर का यूपीआय बॅलेट मध्ये जर तुम्ही पैसे जमा केले आणि त्यातून यूपीआय पेमेंट केला असेल तर त्या विक्रेत्याला एक पूर्णांक १% सर्विस चार्ज द्यावा लागणार आहे
मित्रांनो हे महत्वाचा बदल आहे तेव्हा अजूनही काही सर्विसेस प्रस्तावित आहेत तसेच या यूपीआय सर्विसेस ला इम्प्लिमेंट मध्ये येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून हे नियम एन एफ टी व आर टी जी एस या ऑनलाईन पेमेंट साठी सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे आणि लवकरच आरबीआयच्या वतीने नियमावली निर्गमित करण्यात येतील .ही माहिती आवडली असेलतर मित्रांना नक्की शेअर करा .धन्यवाद