आधार कार्ड अपडेट करतायं मग हे कागदपत्रे तयार ठेवा !Update Aadhar Card Online

आता प्रत्येक भारतीय नागरिकांकडे त्याच्या ओळखीचा पुरावा ,पत्ता पुरावा ,म्हणून आधार कार्ड आहे त्यामुळे Aadhar Card खूप महत्व प्राप्त झाला त्यामुळे हा कार्ड कधीही अपडेट असणे आवश्क्यक आहे .तुम्ही आधार कार्ड काढल्या पासून ०५ झाले असतील तर एखादा नक्की अपडेट करा Aadhar Card Update मुळे कार्ड मुळे सुविधा उत्तम सेवा ,प्रमाणीकरण यशाचा जो दर वाढण्यास मदत होईल .

आधार क्रमांक हा भारतातील रहिवाशासाठी ओळखीचा सार्वजनिक स्विकारलेला पुरावा म्हणून उदयास आला आहे देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकारव्दारे चालवल्या जाणार्‍या जवळपास १२०० सरकारी योजनाच्या सेवाच्या वितरणासाठी आधार आधारित ओळख वापरलं जात आहे तसेच अनेक सेवा देखील ग्राहकांना अखंडपणे प्रमाणीकृत करण्यासाठी आणि ऑनबोर्ड करण्यासाठी आधार कार्ड वापरलं जात .

Aadhar Card Update Rules :- 

आधार क्रमांक ,आधार नोंदणी आणि Aadhar Card Update  विनियम २०१६ नुसार आधार क्रमांक हे आधार धारक नोंदणी तारखेपासून दर १० वर्षानी POI आणि POA (ओळखीचा पुरावा आणि राहिवाशी पुरावा) कागदपत्रे जमा करून त्याच्या माहितीची सतत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आधारमध्ये त्यांचे अपडेट किमान एकदा करणे आवश्यक आहे .म्हणून काय अपडेट करायचं त्यानुसार कोणते कागदपत्रे लागतात या बदल संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत .

Aadhar Name Upadate Documents :-नांव दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्रे

  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्रायविंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • शासकीय ओळखपत्र
  • शाळा किंवा कॉलेजच्या पत्र ,फोटो सहिशिक्का
  • मॅरेज सर्टिफिकेट फोटो सहित
  • खाजदार ,आमदार ,नगरसेवक यांचा पत्र ,फोटो सही शिक्का

वरील पैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे .

पत्ता दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्रे (कोणतेही एक):-
  • मतदान कार्ड
  • पॅन कार्ड
  • ड्रायविंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • शासकीय ओळखपत्र पत्तासहीत
  • पेन्शनर कार्ड
  • स्वातंत्र्य सेनानी कार्ड
  • तहसिलदार यांनी दिलेल्या फोटो असलेला ओळखपत्र
  • मॅरेज सर्टिफिकेट फोटो सहित
  • खाजदार ,आमदार ,नगरसेवक यांचा पत्र ,फोटो सही शिक्का
जन्म तारीख दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्रे (कोणतेही एक):-
  • जन्म दाखला
  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • १०-१२ मार्कशिट तारीख असलेला
  • शासकीय ओळखपत्र जन्म तारखेसहित
  • स्वातंत्र्य सेनानी कार्ड जन्म तारखेसहित
  • बोनाफाईड सर्टिफिकेट फोटो नांव जन्म तारखेसहित

मित्रांनो ५ वर्षाच्या आतील बाळासाठी १) जन्म दाखला २) आई किंवा वडीलांचा आधार कार्ड ,जर ५ वर्षाच्या पुढील असेलतर १)शाळेचा बोनफाईड फोटो सहित शिक्का /शाळेचा ID कार्ड २)रेशन कार्ड

वरील कागदपत्रे आवश्यक आहेत हा पोस्ट जर तुम्हाला महत्वाचा वाटला तर नक्की इतर मित्रांना शेअर करा . do

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top