जमिनीचा डिजिटल स्वाक्षरी उत्तरा काढा ULPIN नंबर वापरुन |ULPIN in Land Maharashtra 2022

ULPIN Land Parcel Identification Number  :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,महाराष्ट्र शासन महसूल विभाग कडून mahabhulekha 7/12 online सातबारा उतारा मध्ये अपडेट करण्यात आला आहे, Land Records अपडेट मुळे  जमिनीच्या उतारावर जो सिटी सर्वे क्रमांक कालबाह्य झाला आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला युएलपीआयएन व एलजीडी कोड दिसून येत आहे, आपण डिजिटल किंवा साधे उतारा जरी काढलात तरी त्यावर जमिनीसाठी असलेला युएलपीआय एन दिसत आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक जमिनीच्या उताराला भूआधार म्हणजेच ” युनिट लँड पार्सल”( आयडेंटिफिकेशन), नंबरसह आता ( युएलपीआयएन) लोकल गवर्नमेंट डिरेक्टरी( एलजीडी) कोड प्राप्त झाला आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून युएलपीआयएन नंबर वापरून आपले डिजिटल उतारा कसे काढायचे प्रत्येक स्टेप नुसार माहिती पाहणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा.

युएलपीआयएन & एलजीडी :

मित्रांनो युएलपीआयएन हा त्या जमिनीचा भूआधार क्रमांक दर्शवतो तर एल जी डी कोड त्या महसूल गावाचा विशिष्ट कोड दर्शवतो, युएलपीआयएन हा नंबर ११ अंकी आहे तर एलजीडी कोड ६ अंकी आहे. हे दोन्ही क्रमांक उताराच्या डाव्या कोपऱ्यात गट क्रमांक च्या समोरील बाजून दिसतात.land dtails युएलपीआयएन यामुळे उतारा डाऊनलोड करणे, एखादा शेती जमिनीची सविस्तर माहिती घेणे, शेती व्यवहार करणे हे सर्व गोष्टी सहज रित्या होणार आहेत, किचकट असलेला सिटी सर्व्हे आताच लक्षात ठेवण्याची गरज नाही, तुम्ही जर फक्त ११ अंकी हा नंबर लक्षात ठेवलं तरी आपल्या जमिनीचे उतारा पाहता येत .Land Records

युएलपीआयएन प्रथम कोठे भेटेल :

  • जमिनीचे ७/१२ मध्ये १५  सप्टेंबर २०२२ पासून झालेल्या बदलामुळे डिजिटल उतारे काढताना अडचण येत आहे,(seventeen profile)आज पर्यंत आपली उतारे आपण गट नंबर च्या साह्याने किंवा खातेदारांचे नावाप्रमाणे तसेच आडनावावर सर्च करून काढता येतो , पण या अपडेट नंतर ना डिजिटल स्वाक्षरी चे उतारे आपल्याला युएलपीआयएन वापरूनच काढावे लागणार आहे. त्यासाठी प्रथम आपल्या जमिनीचा युएलपीआयएन हा नंबर काढून घेणे गरजेचे आहे, त्यासाठी खालील लिंकवर प्रथम क्लिक करा ,
    https://bhulekh.mahabhumi.gov.in/
  • विभाग निवडा – Go ऑप्शन वर क्लिक करा
  • ७/१२ हा पर्याय निवडा
  • जिल्हा निवड करा
  • तालुका निवडा
  • महसूल गाव निवडा
  • जमिनीचा गट क्रमांक
  • शोधा या ऑप्शनवर क्लिक करा
  • खालील रकान्यात मध्ये दर्शवणारे गट क्रमांक मध्ये तुमच्या गट क्रमांक निवडून
  • खालील बॉक्समध्ये तुमचे मोबाईल क्रमांक लिहा.Land Records
  • पुढे येणारा जो कॅप्चर आहे टाईप करून व्हेरिफाय कॅप्चर या पर्यायावर क्लिक करा.
  • मित्रांनो मग तुमच्या समोर जो साधा उतारा आहे तो ओपन होईल त्या उतारावर जमिनीच्या गट क्रमांकाच्या समोरील बाजूला तुम्हाला युएलपीआयएन दिसेल .
  • ११ अंकी क्रमांक लक्षात ठेवा पुढे जाऊन हा क्रमांक डिजिटल स्वाक्षरी उतारा काढण्यासाठी लागणार आहे.land record mahabhulekha

डिजिटल स्वाक्षरी चा ७/१२ उतारा काढण्याचा प्रोसेस:

प्रथम महाराष्ट्र शासन महसूल विभागाचा अधिकृत वेबसाईट लिंक ओपन करा.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/
या वेबसाईटवर पहिल्यांदा नवीन वापर करता खालील प्रमाणे रेगुलर पर्याय निवडून नोंदणी करा, नोंदणी झाल्यानंतर लोगिन आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.नवीन वापर करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर

  • आपली वैयक्तिक माहिती भरा
  • पत्रव्यवहाराचा पत्ता
  • लॉग इन ची माहिती

वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर वापर करता नोंदणी यशस्वी पूर्ण केली आहे असा संदेश येईल, या ठिकाणी तुम्हाला लोगिन आयडी पासवर्ड प्राप्त होईल, या अधिकृत संकेतस्थळावर आल्यानंतर न युजर नेम व पासवर्ड लिहून लॉगिन करा,

न्यूयुजर नेम व पासवर्ड लिहून लॉगिन करा : 

  • जिल्हा निवडा
  • तालुका
  • गाव
  • या ठिकाणी जो होम पेज असेल एक नव्याने टॅब ॲड झाला आहे
  • या ठिकाणी” आपल्याला युएलपीआयएन क्रमांक माहिती आहे का?
  • समोरील चेक बॉक्स वर क्लिक करा
  • खालील बॉक्समध्ये ११ अंकी युएलपीआयएन क्रमांक लिहा
  • व्हेरिफाय या पर्यायावर क्लिक करा
  • खाली दर्शवणारा जमिनीचा गट क्रमांक पहा कन्फर्म पर्यावरण क्लिक करा
  •  डिजिटल वॉलेट मधील १५ रुपये रक्कम आकारले जाते .
  • डिजिटल उतारा डाउनलोड होईल

टीप :

डिजिटल स्वाक्षरी उतारा काढण्यासाठी प्रत्येकी १५ रुपये आकारली जाते त्यासाठी आपण बनवलेल्या युजर आयडी वर बॅलेन्स ठेवणे गरजेचे आहे, उत्तरा  काढण्याअगोदर डिजिटल उताराच्या आयडी मध्ये रक्कम असणे आवश्यक आहे.

आजून सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा आणि विडिओ बघा ,

मित्रांनो डिजिटल स्वाक्षरी उतारा युएलपीआयएन नंबर वापरून कसे काढावे ही संपूर्ण माहिती आपण पाहिलात हा महत्त्वाचा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर इतर मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *