तुकडेबंदी कायद्यात फेरबदल गुंठयामध्ये जमीन खरेदी वि.क्री असं होणार !

Bhoomi Land Records Update 1956 महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडे बंदी लागू आहे.म्हणजे काय तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचे जे काही प्रमाणभूत क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही.Ferfar Kasa Kadhava अशा जमिनीचा तुम्ही व्यवहार केला तर त्याची दस्त नोंदणी होत नाही .महाराष्ट सरकारने १२ जुलै २०१९ रोजी परिपत्रक काढलं आणि त्यानंतर राज्यात १ गुंठे,२गुंठे,३गुंठे अशा गुंठ्यांमध्ये जमिनीचा व्यवहार करण्यावर खरेदी विक्री करण्यावर बंदी आली .या फेरबदला चा अनेकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला हे प्रकरण नंतर न्यायालयात गेलं .

०५ मे २०२२ रोजी राज्य सरकारने एक राजपत्र प्रसिद्ध केलं राज्यातील सगळ्या जिल्ह्यांसाठी जिरायत क्षेत्रासाठी तुकड्याचे प्रमाणभूत क्षेत्र २०गुंठे ,बागायती साठी तुकड्याचे क्षेत्र १० गुंठे करण्यात आले.पण काही शेतकऱ्यांना अगदी एक-दोन-तीन गुंठ्यांमध्ये जमिनीचा व्यवहार करावा लागतो काहीना विहीरीसाठी ,केंद्र सरकार व राज्य सरकारच्या घरकुल योजना ,शेती रस्ता इत्यादि या सर्व कारणारिता महाराष्ट्र सरकारने तुकडे बंदी कायदा सुधारणा केली आहे.नेमकी सुधारणा काय आहे कोणत्या कारणांसाठी कोणत्या चार कारणांसाठी जमीन तुकड्यांमध्ये तुम्ही खरेदी विक्री करू शकता याची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत .

Tukde Bandi Kayada Latest Update 

तुकडे बंदी कायद्यात सुधारणा करण्याचा एक प्रारूप महाराष्ट्र सरकारने १४ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध केलं होतं या प्रारूपात तुकडे बंदी कायद्यात शिथिलता देणारे नियम होते या प्रारूपात हरकती आक्षेप मागविण्यात आल्या आणि १४ मार्च २०२० रोजी महाराष्ट्र सरकारने कायदा  प्रसिद्ध केलं आणि ते तत्काळ लागू करण्यात आला.आता ही जी काही सुधारणा करण्यात आली आहे ती चार बाबींसाठी लागू असणार आहेत.

तुकडे बंदी कायदा लागू असलेली बाबी :- 

  1. विहीरीसाठी
  2. शेतरस्त्यासाठी 
  3. सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी
  4. केंद्र -राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी

शेतकरी मित्रांनो वरील घटकातील जमीन खरेदी वी.क्री करितातुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे.Tukda Bandi Kayda 2024  आपण केलेला अर्ज तहसिल कार्यालयास प्राप्त होणार त्याच्या मार्फत अंतिम अहवाल सादर केलं जाणार . 

Tukda Bandi Kayda चार बाबींसाठी निकष नेमके काय ? 

विहीर :-

या मध्ये आपण जर विहिरीसाठी अर्ज करीत असाल तर नमुना १२ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे पाण्याच्या उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण आणि विकास अभिकरण अधिकाऱ्यांना दिलेलं ना हरतकत प्रमाणपत्र जोडायचा आहे. विहीरीचे निकषाचे बाब ,

  1. संबंधित खरेदीदारांना किमान प्रमाणभूत क्षेत्र धारण केलेलं असावं
  2. जिल्हाधिकारी विहिरीकरता कमाल ०५आर म्हणजेच ०५ गुंठे पर्यंत जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी देऊ शकतात.
  3. म्हणजे पाच गुंठे पर्यंत तुम्ही जमिनी विहिरीच्या कारणासाठी वि.क्री करू शकता
  4. अश्या जमिनीच्या विक्री खतानंतर विहिरीच्या वापराकरता मर्यादित शेरा ७/१२  उताऱ्यावर इतर हक्कात नोंदवला जाईल.Digital Utara

शेतरस्ता:-

  1. शेतकर्‍यांना जर शेतरस्ता पाहिजे असेलतर जिल्हाधिकार्‍यांकडे नमूना १२ मध्ये अर्ज करायचं आहे त्यासोबत शेतरस्ताचा कच्चा नकाशा जोडायचा आहे पुढे  जिल्हाधिकारी यांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या रस्त्या बाबतचा अहवाल तहसीलदारांकडून मागिला जाईल तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी क्षेत्रासाठी जमिनीचा हस्तांतरण करण्यास परवानगी देतील.
  2. अशा जमिनीच्या विक्री -खतांनातर नजीकच्या जमीन धारकांच्या वापराकरिता शेत रस्ता खुला राहील अशी नोंद सातबारा उताऱ्यावरील इतर हक्क रकान्यात करण्यात येईल.

सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी :- 

  1.  अर्जासोबत भूसंपादनाचा अंतिम निवडा किंवा कजाप (कमी-जास्त प्रमाणपत्र) जोडावे
  2.  जिल्हाधिकारी अर्जासोबत जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी केल्यानंतर जमीन हस्तांतरणस मंजूरी देतील

केंद्र -राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी :- 

केंद्र व राज्य सरकारचे ग्रामीण घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांना तुकड्यांमध्ये किंवा गुंठ्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री करता येऊ शकते त्यासाठी त्यांना नमुना १२ मध्ये  जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावे लागेल.

  1. जिल्हाधिकारी तुम्ही घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत का? नाही ! याची  खात्री करतील पंचायत समिती मार्फत
  2. नंतर ग्रामीण घरकुलासाठी प्रत्येक कमाल १००० चौरस फुटापर्यंत जमिनीचा हस्तांतरण करण्याचा जिल्हाधिकारी मंजुरी देऊ शकतात.

महत्वाचे अट :-

  1.  विहिरीसाठी,शेत रस्त्यासाठी तसेच घरकुल लाभासाठी जमिनीच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी केवळ एक वर्षांसाठी वैध असेल पुढे जाऊन अर्जदारच्या विंनंतीवरून केवळ दोन वर्षा करिता मुदतवाढ मिळेल . 
  2. ज्या कारणासाठी हस्तांतरणाची परवानगी मिळाली त्याच कारणासाठी जमिनीचा वापर करावा लागेल अन्यथा अशी मंजुरी प्रारंभापासून रद्द करण्याचं मान्यत येईल . 

शेतकरी मित्रांनो या चार कारणांसाठी जमिनीची खरेदी-विक्री जर का तुम्हाला करायांच असेल तर  जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे सुरुवातीला जिल्ह्याचे नाव , विषय ,पुढे तुमचं नाव, गाव ,तालुका, जिल्हा, टाकायचा आहे त्यानंतर जमीन विकणाऱ्या व खरेदी करणाऱ्या चे नाव, पत्ता ,टाका सदर जमिनीचे वर्णन म्हणजे गट नंबर ते कोणत्या गावात तालुक्यात जिल्ह्यात येते ते नमूद करायचा आहे.

आता विहिरीच्या बाबतीमध्ये गुंठया मध्ये व्यवहार करणार असाल तर प्रस्तावित विहीरीचा व्यास आहे फुटात नोंद करायचं आहे .शेत रस्ता जर गुंठयातील व्यवहार असेल त्याची लांबी रुंदी क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनार्थ तुम्ही खरेदी विक्री गुंठ्यामध्ये करणारा असेल घरकुल योजनेचा तापशिल या अर्ज मध्ये नोंद करायचं आहे .अश्या पद्धतीने अर्ज भरून शेवटी सही करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू शकता .हा पोस्ट आवडलं असेल तर मित्रांना नक्की शेअर करा . 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top