सुकन्या समृद्धी योजना नियम, पात्रता, व्याजदर 2023 | Sukanya Samriddhi Yojana(SSY) 2023

सुकन्या समृद्धी योजना (SSY) २०२३ | Sukanya Samriddhi Yojana (SSY) :-

प्रत्येक पालकाला आपल्या मुलीचं खूप काळजी असतं, आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे, तिला कोणत्या वयामध्ये काय पाहिजे ते मिळावं यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करत असतो,मुलीसाठी प्रयत्न करणारा प्रत्येक पालकांना मदतीचा हात म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून सन २०१५ ‘सुकन्या समृद्धी योजना’ सुरू करण्यात आली ही योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या “बेटी बचाओ,बेटी पढाओ “ या अभियानाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या पालकांना जास्तीत जास्त व्याजदर केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो . SSY Scheme 2023 या योजनेत पालकांना आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे या गुंतवणुकीतून मुलीचे शिक्षण, लग्नाच्या वेळी येणारा खर्च, हे सर्व गोष्टी पुढे जाऊन सहजरीत्या होण्यासाठी पालकांना या योजनेअंतर्गत आतापासूनच गुंतवणूक करण्याची गरज आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांना आपल्या मुलीच्या १० वर्षे होण्याआधीच तिच्या नावे सुकन्या समृद्धी योजना ची खाते काढावे लागेल. योजनेचे खाते उघडल्यांनातर सुरुवातीला कमीत कमी २५० रुपये व जास्तीत जास्त १.५ लाख रुपये ठेवी स्वरूपात ठेवू शकता.

सुकन्या समृद्धी योजना ? (SSY Scheme 2022)

सुकन्या समृद्धी योजना सर्वात लहान बचत खाते चा प्रकार आहे हे खाते १० वर्षाच्या आतील मुलीच्या नावे काढता येते या बचत खाते अंतर्गत पालकांना आपल्या मुलीचे उज्वल भविष्य निश्चित करता येते,Sukanya Samriddhi Yojana यामध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कम मुलीच्या २१ वर्षानंतर योजनेचा लाभ पूर्णपणे मिळतो, त्या अगोदर शिक्षणासाठी म्हणून आपण रक्कम काढू शकतो, या योजनेचे पूर्ण लाभ घेण्यासाठी आपल्याला १५ वर्षे गुंतवणूक करावे लागेल ,विशेष बाब सन २०२२-२३ या वर्षात या खातेवर जम्मा होणारे र*क्कम वर ७.६ % ट*क्के व्याज देण्यात येते  आहे . त्याच बरोबर १.५ लाख रुपये जर जम्मा केलात तर तुम्हाला टॅक्स मध्ये सुट्ट भेटणार आहे .

सुकन्या समृद्धी योजना उद्देश :

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश मुलीच्या भविष्यात येणाऱ्या आर्थिक समस्यांना सहजरित्या सामोरे जाण्यासाठी  ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत सर्वसामान्य पालकांना आपल्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी किमान २५० रुपये गुंतवणूक प्रत्येक महिना करून भविष्यात येणाऱ्या आर्थिक समस्यांना सहजरीत्या तोंड देता येणार आहे, Sukanya Samriddhi Yojanaया योजनेअंतर्गत कमी गुंतवणुक करून आपल्या मुलीला उच्चशिक्षित करण्याचा ध्येय गाठू शकणार आहेत.

सुकन्या समृद्धी योजना चे महत्त्वाचे मुद्दे :

  • ही योजना भारतामध्ये” भारतीय रिझर्व बँक” यांच्याद्वारे प्रमाणित केलेल्या २८ बँकेत सुविधा मिळणार आहे.
  • योजनेचा पूर्ण  लाभ मुलीच्या २१ वर्षानंतर मिळणार.
  • मुलीचा आकस्मिक निधनानंतर पालक योजनेसंबंधी सर्व कागदपत्रे सादर करून ही योजना बंद करू शकता.
  • सुकन्या समृद्धी योजना एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये तसेच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहज रित्या ट्रान्सफर करता येते.
  • पालकांना एकाच वेळी आपल्या ३ मुलींचे नावे योजनेचा लाभ घेता येणार आहे.Sukanya Samriddhi Yojana
  • इयत्ता दहावी पास नंतर पुढील शिक्षणासाठी रकमेचे ५० ट*क्के इतके लाभार्थ्याला काढता येणार.

योजनेची पात्रता/ निकष:

  1. भारतीय रहिवासी असला पाहिजे
  2. मुलीचे वय १० वर्षाच्या आत असला पाहिजे
  3. पालकांना दोन मुली असतील तर दोघांसाठी बचत खाते सुरू करता येते , त्याचबरोबर जुळ्या किंमतीला मुली झाल्यास त्यांच्या ही नावे सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची अनुमती आहे.

सुकन्या समृद्धी योजना चे कागदपत्रे :

  1. सुकन्या समृद्धी योजना चा फॉर्म
  2. मुलीचा जन्म प्रमाणपत्र
  3. आई-वडिलांचा दोघांपैकी एकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी
  4. रेशन कार्ड
  5. मतदान कार्ड
    वरील कागदपत्रे बरोबर पोस्ट ऑफिस मध्ये मागितले जाणारे इतर कागदपत्रे असणे आवश्यक.

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ :

या योजनेची सुरुवात कमीत कमी २५० रुपये जास्तीत जास्त १.५ लाख रुपये आपण जमा करू शकता, जमा केलेला रक्कम  वर लाभार्थ्याला ७.६ ट*क्के इतका व्याजदर मिळणार आहे,SSY Scheme 2023 उदाहरणार्थ: प्रत्येक महिना तुम्ही जर २५० रुपये जमा केलं तर १५ वर्षाचे एकूण रक्कम तुमचे ४५००० रु इतके होतील त्यावर मिळणारे व्याज ८२५९३ रुपये एवढे भेटणार , योजनेच्या पूर्ण कालावधी संपल्यानंतर तुम्हाला १,२७,५९३ रुपये इतकी रक्कम मिळणार.त्याच बरोबर तुम्ही जर ५०० रुपये महिना जमा केलात तर मिळणारा रक्कम २,५५,१९० रुपये इतका असणार आहे .आणि प्रती महिना १००० रुपये जमा करत असाल तर ५,१०,३७३ रुपये इतकी रक्कम मिळणार .
मित्रानो हा लेख जर आवडला असेल तरी इतर मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top