saur krushi vahini yojana madhun vij puravatha 2023

saur krushi vahini yojana 2023 update :-

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत हे प्रकल्प एकूण १८ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर उभारला असून या दोन्ही प्रकल्पावर होणारा एकूण खर्च २३ कोटी इतका आहे. यामध्ये निर्मिती होणारे विज जवळील ३३/११ के.व्ही उपकेंद्राला जोडली जाणार आहे.या दोन्ही सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर प्रत्येकी १० ते १५ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे .सौर ऊर्जाद्वारे मिळणारी वीज सुमारे ३.३० रुपये प्रति युनिट दराने मिळणार असून महावितरण समित वीज खरेदी करार करण्यात आला आहे.

 नागेवाडी:-

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील नागेवाडी येथील प्रकल्पाची स्थापित क्षमता ४.२ मेगावाट आहे.

या सर्व प्रकल्पामुळे येथील जवळच्या चार गावांना म्हणजेच नागेवाडी, अंजनी,वडगाव आणि लोकरेवाडी

या गावातील सुमारे १२०० ते १३०० वीज ग्राहकांना या प्रकल्पाची लाभ मिळणार आहे.

निर्मिती होणारा वीज हे ३३/११ के.व्ही अंजनी नागेवाडी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे. हे प्रकल्प शासकीय

पडीक जमिनीवर उभारण्यात आले असून क्षेत्र १० हेक्टर इतके आहे.saur krushi vahini yojana

 वालेखिडी :-

वालेखिंडी प्रकल्पाची  क्षमता ३.३६ मेगाव्हॉट आहे.वालेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली या सौर प्रकल्पामुळे वालेखिंडी बरोबर बेवनूर,

सिदेवाडी आणि नवलेवाडी या गावातील सुमारे १००० वीज ग्राहकांना लाभ होणार आहे .

या ठिकाणाहून निर्मिती होणारी वीज ३३/११ के.व्ही वालेखिंडी उपकेंद्राला जोडण्यात आला आहे .

हे प्रकल्प सुमारे ८ हेक्टर शासकीय पडीक जमिनीवर उभारण्यात आला असून याच्यासाठी एकूण खर्च १२ कोटी आहे.

saur krushi vahini yojana 2023 update :-

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत आगामी काही महिन्यात महानिर्मितीचे बोर्गी जिल्हा सांगली २ मेगावाट, कुंभोज जिल्हा कोल्हापूर ४.४ मेगावाट, सोनगाव जिल्हा सातारा ४.२ मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पाची काम अंतिम टप्प्यात आहेत.

सद्यस्थितीला महानिर्मितीच्या एकूण ३६७.४२ मेगावाट स्थापित क्षमतेचा सौर प्रकल्पाची वीज उत्पादन होत आहे या योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता सुमारे १००० मेगावाट सौर ऊर्जा प्रकल्पाची लक्ष निश्चित करण्यात आले आहे.saur krushi vahini yojana

 

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top