Sauchalay Online Registration २०२३ | शौचालय योजनेचा ऑनलाइन फॉर्म असं भरा
शौचालय योजनेचा ऑनलाइन फॉर्म असं भरा :-
नमस्कार मित्रांनो,स्वागत तुमचं Mhsheti.com या वेबसाईट वर.मित्रांनो केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर महाराष्ट्रतील ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालय अनुदान योजना राबविला जात आहे.या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात शौचालय नसलेल्या व्यक्तींना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिलं जातं.महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायत मार्फत खूप मोठ्या प्रमाणात वैयक्तिक शौचालय लाभ नागरिकांना दिला आहे.आता महाराष्ट्रात सन २०२२ शौचालय अनुदान चा दुसरा टप्पा सुरू झाला आहे .महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने शौचालयाचे अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारले जात आहे .आजच्या लेखात योजनेसाठी पात्रता ऑनलाइन अर्ज कसे करावे ह्या बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
स्वच्छ भारत मिशन -ग्रामीण Ph-२
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छ ते संदर्भात जनजागृती निर्माण करणे.स्वच्छतेची व्याप्ती वाढवणेव उघड्यावर मलविसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यासाठी कुटुंबप्रमुखाच्या नावाने वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान शासनामार्फत देण्यात येते.हे अनुदान केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे दिले जाते महाराष्ट्रात या योजनेचा लाभ दारिद्र रेषेखालील सर्व कुटुंबे तसेचअनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,महिला कुटुंब प्रमुख इत्यादी दिले जाते.
शौचालय अनुदानास पात्र लाभार्थी :
- महिला कुटुंब प्रमुख
- भूमिहीन शेतमजूर व अल्पभूधारक शेतकरी वर्ग
- दारिद्र रेषेखालील सर्व कुटुंबे (APL)
- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC,ST)
- शारीरिक दृष्ट्या अपंगत्व असलेली व्यक्ती
प्रोत्साहन अनुदान किती मिळते :
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत प्रति लाभार्थ्यांना १२००० रुपये इतके अनुदान दिले जाते हे अनुदान जाब कुटुंब प्रमुखाचे नावे SBM च्या पहिल्या टप्प्यात
शौचालय अनुदान घेतले नाही त्यांनाच हा प्रोत्साहन अनुदान दिले जाते.
शौचालय अनुदानसाठी ऑनलाईन अर्ज :
मित्रांनो ऑनलाइन अर्ज सुरुवात करण्याअगोदर तुमच्याकडे तुमचा बँक पासबुक चा स्कॅन कॉपी करून घ्या.ई-मेल आयडी, स्वतःचा मोबाईल इत्यादीगोष्टी ची तयारी ठेवून ऑनलाइन अर्ज खाली दिलेल्या स्टेप प्रमाणे भरा.
ऑनलाइन प्रणालीद्वारे शौचालय करता अर्ज करण्याची सुविधा खालील लिंक वर दिले आहे:
हा लिंक रजिस्ट्रेशन करण्यासाठी असेल https://sbm.gov.in/SBM_DBT/Secure/DBT/DBT_Registration.aspx या लिंक च्या साह्याने
रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉगिन करू शकता https://sbm.gov.in/sbm_dbt/secure/login.aspx
- १ नंबर लिंक वर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन ऑप्शन चा पेज ओपन होईल,
- सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी करावे लागणार
- मोबाईल क्रमांकासह, संपूर्ण नाव, कायमचा पत्ता हे माहिती भरावे
- राज्य सिलेक्ट करा
- खालील बॉक्स मधील(Captchar Code) लिहा
- शेवटी Submit बटनावर क्लिक करा
- सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन होईल .त्या ठिकाणी तुम्ही नोंदवलेल्या
- नंबर वरती एक पासवर्ड आलेला
- असेल पण याठिकाणी मित्रांनो तुमचा पासवर्ड मोबाईल क्रमांकाचे शेवटचे ४ अंक टाकायचे आहेत.
- माहिती भरून sign In या पर्यायावर ती क्लिक करा
- यानंतर ना नवीन पेज open होईल यामध्ये आपला पासवर्ड रीसेट करावे
- पासवर्ड रिसेट केल्यानंतर ना नवीन पासवर्ड टाकून पुन्हा लॉगिन व्हावे
- New Application वरती क्लिक करा.
Section : A
- आपले राज्य ( महाराष्ट्र) निवडा, जिल्हा, तालुका, व गावाची निवड करा
S ection : B
- वैयक्तिक माहिती भरावे
- आपल्या आधार कार्ड प्रमाणे नाव व नंबर भरावे
- Verify Aaddar Number या पर्यायावर क्लिक करावे
- वडिलांचे नाव,Catgeor APL,BPL निवडा
S ection C :
- बँक IFSC Code भरा
- बँक पासबुक प्रमाणे नाव, शाखेची माहिती, खाते क्रमांक बरोबर भरा
- बँक पासबुक तर स्कॅन कॉपी सिलेक्ट करून अपलोड करा
- शेवटी Apply बटनावर ती क्लिक करा
- आपल्यासमोर आपण भरलेल्या माहितीची आपलिकेशन नंबर दिसेल ते लिहून घ्या किंवा प्रिंटआऊट काढून घ्या
- त्या Application नंबर च्या साह्याने आपण केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकता.
- आपल्या अर्जाची स्टेटस पाहण्यासाठी View Application पर्यावरण क्लिक करून पाहू शकता.
हा वैयक्तिक शौचालय चा महत्त्वपूर्ण लेख तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद.