शेताचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना | Salokha Yojana 2023 Maharashtra

शेताचे वाद मिटवण्यासाठी सलोखा योजना :-
Salokha Yojana Maharashtra 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यातील शेत जमिनीचे वाद मिटवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक १३ डिसेंबर २०२२ रोजी पार पडली आहे. या बैठकीमध्ये सलोखा योजना महाराष्ट्रात राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आले आहे.पण ही योजना नेमकी काय ? सलोखा योजना का राबवण्यात येत आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत.
सलोखा योजना महाराष्ट्र २०२३ :
राज्यात शेतजमिन वहिवाट ,जमिनीच्या कमी जास्त क्षेत्र बाबत ,शेत जमिनीचा ताबा अशा अनेक कारणाने शेतकर्यांन मध्ये आपापसात वाद होतात हेच वाद मिटविण्यासाठी शासन ही सलोखा योजना आमलात आणली आहे .या योजनेचा मुख्य उद्देश शेत जमिनी संबंधीचे वाद मिटविणे आहे “Salokha Yojana Maharashtra 2022”.
सलोखा योजना १९७१ तुकडे बंदी कायदा :
महाराष्ट्र राज्यात १९७१ मध्ये तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आलेला होता. या कायद्यानुसार अनेक जमिनीचे एकत्रीकरण करण्यात आले होते.म्हणजे एकाच परिवारातील अनेक व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन एकाच नावावर करण्यात आलेली होती. आता राज्य शासन जे एकाच्या नावावर असलेला शेतजमीन ताबा दुसर्याकडे असल्यास व दुसर्या शेतकर्याच्या नावावरील शेत जमिनीचा ताबा जो पहिल्या जमिंनधारकाकडे असल्यास,अशा शेतकर्यांना जमीन अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी व मुंद्राक शुल्क मध्ये सवलत या योजने अंतर्गत देण्यात येणार आहे .“Salokha Yojana Maharashtra 2022”
या मध्ये दस्त नोंदणीच्या अदलाबदलसाठी मुद्रांक शुल्क १००० रुपये आणि नोंदणी फी १०० रुपये असणार आहे . “Salokha Yojana Maharashtra 2022”
सलोखा योजना फायदे :
- शेतकर्याच शेतजमिनीच्या वाद मिटविण्यासाठी होणार खर्च वाचणार .
- कमी वेळेत जमिनीचे वाद मिटणार .
- या योजनेमुळे दोन शेतकर्या मधील संबंध सलोख्याचे राहणार .
- मुंद्राक शुल्क व नोंदणी फी होणार खर्च वाचणार .“Salokha Yojana Maharashtra 2022”
महाराष्ट्र सरकारच्या योजनेची कार्यपद्धती कशा पद्धतीने जाहीर करते ते या योजनेच्या सविस्तर शासन निर्णय आल्यानंतर आपणास करणार ,तूर्तास सरकारच्या या योजने बद्दल ची माहिती आपणास या पोस्टच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा (salokha Yojana Maharashtra 2022)