What Is The Right to Information Act 2005 in Maharashtra ?
नमस्कार मित्रांनो,माहिती अधिकाराचा उगम सर्वात प्रथम स्वीडन देशात १७६६ मध्ये झाला “फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट“पारित करून माहितीचा अधिकार सर्वप्रथम मान्यता देण्यात आले, या देशानंतर अमेरिका,डेन्मार्क, फीलंड, नॉर्वे, फ्रान्स, कॅनडा, स्पेन, जपान, या देशाने ही माहिती अधिकार चा कायदा केले. मित्रांनो विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने देखील त्यांच्या १९४८ च्या आमसभेच्या पहिल्या अधिवेशनात युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राइट ची घोषणा करून नागरिकांना माहिती मिळण्याचे स्वतंत्र एक मूलभूत मानवाधिकार असल्याचे आपल्या ठरावात सहमत केले आहे.RTI Maharashtra
RTI Maharashtra Marathi Pdf :-
जगभरामध्ये पारदर्शकतेचे नवे पर्व या माहिती अधिकार कायद्यामुळे सुरू झाला जगातील बऱ्याच देशांमध्ये या कायद्यामुळे प्रशासन व्यवस्थेला प्रगतीला गती मिळाली. फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्किंग या नावाने बिल्जेरियामध्ये माहिती अधिकाऱ्याने भरलेल्या संघटना व कृती गटाने एक नवी कृतिशील संघटना २८ सप्टेंबर २००२ मध्ये उभे केले.
या संघटनेने उभा केलेला जाळे मुळे जगभरामध्ये माहिती अधिकाराची Mahiti Adhikar जनजागृती वाढण्यास सुरुवात झाले यामुळे प्रशासकीय कामातील पारदर्शकता, भ्रष्टाचार मुक्त शासकीय कामे, शासकीय कामाची गतिशीलता या कायद्यामुळे झाले म्हणून २८ सप्टेंबर हा जागतिक माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो.
Mahiti Adhikar :-
आपल्या महाराष्ट्र शासनाने देखील २० सप्टेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून घोषित केला. या अधिकाऱ्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध व्यापक उपक्रम आजही राबवल्या जातात.RTI Online Maharashtra
माहिती अधिकार केंद्रीय कायदा :-
मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १९(१)(क) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येचं माहिती अधिकार अंतर्भूत आहे. म्हणूनच माहिती अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याचे मत सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी भारतातील विविध न्याय निवाड्यात व्यक्त केले आहे. १५ जून २००५ रोजी भारताचे राष्ट्रपती या कायद्याला मान्यता दिले. हे सर्व भारतीय केंद्रीय माहिती अधिकार कायदा अंतर्गत आहेत.
१२ ऑक्टोंबर २००५ पासून या कायद्याची अंमलबजावणी जम्मू-काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारतात सुरू झाली त्याच निमित्ताने 0६ ते १२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये माहिती अधिकाराचा सप्ताह साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा :-
महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसेवकांना अण्णा हजारे यांनी आंदोलनच्या माध्यमातून केलेल्या आग्रह खातर महाराष्ट्र शासनाने तज्ञ व्यकितीच्या समितीच्या शिफारशीनुसार २००२ मध्ये कायदा सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली देशात माहिती अधिकार कायदा पूर्वीपासून सर्वच राज्यात अमलात होता परंतु माहिती अधिकाराचा कायदा पारित करणारा महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.RTI Online Maharashtra
माहिती अधिकाराचा मुख्य उद्देश :-
नागरिकांना आवश्यक असलेली माहिती पुरवणी, प्रशासनात शिस्त निर्माण करून अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती व कार्यक्षमतेत वाढ करणे ,भ्रष्टाचाराचा समूळ निर्मूलन व्हावे,शासकीय कार्य पद्धतीत सुधारणा व्हावे, शासकीय कामकाजामध्ये नियम व अटी बाहेर काम होऊ नये ,शासकीय काम करताना गैरव्यवहारात वाव देता येऊ नये, कोणतेही काम होत असताना जनतेला शंका येत असल्यास त्या कामाची माहिती जनतेला मिळावी यासाठीच माहिती अधिकार कायद्याची निर्मिती झाली.
विशेषता :-
मित्रांनो देशातील प्रत्येक कायदा हे जनतेसाठी तयार केलेले असते सर्व कायदे व माहिती अधिकार चा कायदा यामध्ये फरक आहे. सर्व कायदे जनतेने पाळावे आक्षेपला शासकीय अधिकाऱ्याकडून त्यावर देखरेख होते. या भूमिकेमुळे या ठिकाणी जनता ही दुय्यम ठरत होती. पण राज्यात लागू झालेला माहिती अधिकार कायद्यामुळे सर्वसामान्य जनतेलाही संसदेच्या सदस्या बरोबरची माहिती प्राप्त करण्याचा अधिकार मिळाला आहे..Mahiti Adhikar
प्रशासकीय अधिकारी सार्वजनिक प्राधिकरण शासकीय कर्मचारी आपली कामे प्रामाणिकपणे करतात की नाही हे सर्वसामान्य व्यक्ती पाहू शकणार आहे जनतेच्या आक्षेपला शासकीय अधिकारी अपुरे पडतात का याची तपासणी शासनाला करता येणार आहे.RTI Online Maharashtra
एखाद्या व्यक्तीने जर माहिती अधिकाऱ्याच्या अंतर्गत माहिती मागविल्यास विशिष्ट कालावधीमध्ये त्या प्रशासकीय विभागाला माहिती पुरवणे आवश्यक असते अशा प्रकारच्या होणाऱ्या कारवाहीतून बचाव करण्यासाठी शासकीय कार्यपद्धती निभावणारे अधिकारीस आपल्या कामांमध्ये पारदर्शकता हळूहळू निर्माण करतील त्यामुळे शासनाचा प्रत्येक योजना ही जनता अभिमुक होईल असे झाल्याने देश आणि राज्य हळूहळू भ्रष्टाचार मुक्त होण्याच्या मार्गाने जाईल.
माहिती अधिकार कायद्यातील मुख्य तरतूद :-
what is Right to Information in Marathi :-
माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५ राज्यात अमलात आणल्यापासून डिजिटल युगाच्या भरामध्ये या कायद्याचा महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचत आहे प्रत्येक नागरिकांना आपली हक्काची जाणीव या कायद्याच्या अंतर्गत प्राप्त होतोय देशामध्ये महाराष्ट्र या कायद्याचा जास्तीचा वापर करणारा राज्य आहे.भारतीय कोणत्याही नागरिकाला माहिती मागण्याचा अधिकार आहे पण ही माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे उघड करणे बंधनकारक नाही.
What is the fee for RTI In Maharashtra :-
माहिती मागण्यासाठी साधा अर्ज १० रुपये शुल्क, जीवित स्वातंत्र्य या संदर्भातील माहिती ४८ तासात देणे बंधनकारक ,सर्वसाधारण माहिती देणे अथवा नाकारणे यासाठी साधारणपणे ३० दिवसाची मदत Mahiti Adhikar बाबत माहिती अधिकार्याकडे दाखल झालेल्या अर्जासाठी ३५ दिवस तर त्रयस्थ व्यक्तीसंबंधी येत असलेली माहिती पुरवण्यासाठी ४० दिवसाची मदत देण्यात आली आहे
विहित कालावधीमध्ये माहिती प्राप्त न झाल्यास, दिलेल्या माहितीमध्ये समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रथम आपली अधिकारी अधिकाऱ्याकडे ३० दिवसात आपली करता येते प्रथम आपली मध्ये ही समाधानकारक उत्तर न मिळाल्यास राज्य माहिती आयोगाकडे ९० दिवसाच्या आत दुसरी आपली करता येते . माहिती अधिकारामध्ये गुप्तवार्ता व सुरक्षा संघटना मानवी हक्काचे उल्लंघन इत्यादी संबंधीची माहिती येता येणार नाही
माहिती अधिकार माहितीसाठी कोठे अर्ज करावे?:-
How can I Do RTI In Maharashtra ?
जन माहिती अधिकारी म्हणून जिल्हा किंवा तालुका स्तरावर कोणतेही वेगळे कार्यालय नाही शासनाने प्रत्येक कार्यालयात जन माहिती अधिकार पद निर्देशित केले आहेत आपल्याला ज्या कार्यालयाशी संबंधित माहिती हवी आहे त्या प्रत्येक कार्यालयात जन माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा. या ठिकाणी प्रथम अपिलीय अधिकारी हा संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकारी असतो द्वियम आपली दाखल करण्यासाठी शासनाने बृहन्मुंबई ,कोकण, पुणे ,औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि मुंबई या सर्व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी आयोगाचे खंडपीठ आहेत .Mahiti Adhikar
माहिती आयुक्त चा निर्णय हा दुसऱ्या आपील नंतर चा अंतिम निर्णय राहील या निर्णयाविरुद्ध कोर्टात कोणतेही दावा किंवा खटला दाखल करता येणार नाही.माहिती अधिकाऱ्याचे अर्ज दाखल करताना कोणत्या घटकाची आपणास माहिती हवी आहे याची सविस्तर मांडणी करणे आवश्यक आहे प्रश्नार्थक स्वरूपाची व कारणे विचारणारी माहिती मुद्दा नसलेली गैरसमज उत्पन्न करणारे अर्ज फेटाळण्याची शक्यता अधिक असते एका अर्जात एकाच विषयाची संबंधित माहिती विचारावी
माहिती अधिकार विचारणारी व्यक्ती ही दारिद्र्यरेषेखालील असल्यास ५० पृष्ठापर्यंत ची माहिती मोफत दिली जाते
माहिती अधिकार वेबसाईट :-
महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नर्स ला महत्त्व दिले आहे इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींकरिता शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे www.rtionline.maharashtra.gov.in या अर्ज करू शकता , ही माहिती उपयुक्त वाटलं असेल मित्रांना पाठवा .
सौजन्य : महासंवाद