RTE 25% प्रवेशासाठीचा आधार अट रद्द पण हे कागदपत्रे आवश्यक | RTE Admission Process 2023-24
RTE Admission Maharashtra 2023-24 :-
नमस्कार मित्रांनो ,आर टी आय २५% प्रवेश प्रक्रिया च्या माध्यमातून राज्यातील गरीब व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विध्यर्थ्यांना नामांकित इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश मिळविण्याची सुवर्ण संधी असते ,पण या वर्षीच्या नियम व अटी या मध्ये झालेल्या बदला मुळे ही प्रवेश प्रक्रिया आजून सुरू झाली नाही .आजच्या पोस्ट मध्ये RTE Admission 2023-24 बदल संपूर्ण माहिती पाहणार आहोत तरी हा पोस्ट पूर्ण वाचा .
RTE Admission 2023-24 Maharashtra :-
मित्रांनो ,कोणत्याही शासन योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे तरी आर टी आय २५% प्रवेश हे शासकीय योजना आहे .
प्रवेशासाठी मुलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे असं अगोदर जाहीर करण्यात आले .
पण नंतर बर्याच पाल्याचे आजून आधार कार्ड नाहीत असे निदर्शनात आले महाराष्ट्र शासन सुधारणा करून नवीन नियमावली जाहीर केलं आहे .
👇👇👇👇
RTE Online अर्ज करण्यासाठी
व आवश्यक कागदपत्रे
Aadhar Card RTE Admission Maharashtra :-
RTE 25% Admission 2023-24 शैक्षणिक वर्षात आधार कार्ड नसल्यामुळे मोफत प्रवेश प्रक्रिया पासून कोणी वंचित राहू नये याकरिता राज्य शिक्षण विभागाचे अपर सचिव संतोष गायकवाड यांनी आधार कार्ड(Aadhar Card Update)अट रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत .नवीन नियमाप्रमाणे आधार कार्ड नसेल तरी प्रवेश आर.टी.प्रवेश २०२३-२४ घेता येणार आहे .पण मित्रांनो प्रवेश प्रक्रियेत विध्यार्थी आणि पालकांच्या आधार कार्ड मिळविण्यासाठी केलेल्या अर्ज पावती मात्र बंधनकारक आहे . राज्याच्या शिक्षण विभागाचे अप्पर सचिव यांनी दिलेल्या निर्देशामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे .
कोरोंनाप्रभावीत मुलांचे RTE 25% Admission : –
दिनांक १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोरोंना प्रादुर्भावामुळे निधन झालेल्या वंचित गटातील बालकांचा प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य असणार आहे . अशा बालकांच्या प्रवेशेसाठी सक्षम अधिकारी यांनी दिलेले संबधित पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र ,कोरोंनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णालये सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र ,कोरोंना संबंधित इतर कागदपत्रे सादर करावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत .
RTE Admission 2023-24 Maharashtra :-
आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यातील एकूण ८ हजार ८२७ शाळांची समावेश आहे ,त्यामध्ये १ लाख १ हजार ८८१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत .
👇👇👇👇