रब्बी बियाणे अनुदान २०२३ | Rabbi Seed Subsidy Scheme in mahadbt
रब्बी बियाणे अनुदान २०२३|Rabbi Seed Subsidy Scheme In Maharashtra
भारत हा कृषि प्रधान देश आहे देशातील अंदाजे ६० ट*क्के लोकसंख्या शेती व्यवसाय मध्ये गुतंलेले आहेत.शेती व्यवसाय भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.आज शेतकऱ्यांना त्यांचे पिकाचे उत्पादन वाढावे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या अन्न सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामासाठी बियाणे विकत घेण्यास अनुदान दिले जात.
आता सर्व शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे रास वगैरे झाले असून रब्बी हंगामातील पेरणीसाठी जय्यत तयारी शेतकरी वर्गामध्ये दिसत आहे. या रब्बी हंगामातील कोणकोणत्या बियाणांना अनुदान दिले जाते आणि किती ट**क्के दिला जातोय या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Rabbi Seed Subsidy Scheme In महा-DBT
रब्बी हंगाम बियाणे:
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व योजनेचा लाभ एकाच अर्जाद्वारे व्हावे आणि शेतकऱ्यांना कृषी कार्यालयाचे हेलपाटे वाचावे या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांसाठी महा-डीबीटी हे पोर्टल महाराष्ट्र शासनाने सुरू केले आहे.आता रब्बी हंगामातील बियाणे आपल्या महाडीबीटी संकेतस्थळावर जाऊन शेतकरीवर्गाने अर्ज करावे असे आव्हान कृषी विभागामार्फत सध्या केले जात आहे
या ठिकाणी अर्ज केल्यानंतर ना आपल्याला रब्बी हंगामातील ज्वारी, रब्बी बाजारी , हरभरा, सोयाबीन, इत्यादी पिकांच्या बियाण्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त होणार आहे.
बियाणे साठी अनुदान किती ?
- ज्वारी बियाणे खरेदीसाठी प्रति किलो १५ रुपये ते ३० तीस रुपये इतके राहणार आहे
- आपण कोणत्या प्रकारचे वाण निवडतो यावर बियाणाची अनुदान ठरणार आहे.
- हरभरा प्रति किलो १२ रुपये ते २५ रुपये होणार आहे यामध्ये पण वरील प्रमाणे कोणते वाण घेतोय त्यावर हे किंमत ठरणार आहे.
एकूणच रब्बी हंगामातील इतर पिकांच्या बियाण्यासाठी ५० ट**क्के अनुदान
शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे तरी शेतकऱ्यांनी आपला अर्ज लवकर सादर करावा.
अर्ज कोठे करावे व कागदपत्रे :
- जमिनीचा ७/१२, ८/अ
- आधार कार्ड
- बँक पासबुक
वरील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
नोट:
शेतकरी मित्रांनो तुमच्या आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर लिंक नसेल तर अर्ज सादर करताना.
तुम्ही स्वतः बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून लॉग इन करण्यासाठी सीएससी केंद्रावर हजर राहावे लागेल.
तुमच्या आधार ला जर मोबाईल नंबर लिंक असेल
तर हा फॉर्म तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन भरू शकता.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
निवड प्रक्रिया :
महा-डीबीटी वर अर्ज केल्यानंतर ना गावातील लॉटरी मध्ये निवड झालेल्या २५ शेतकऱ्यांना १०० ट**क्के अनुदान पीक प्रात्यक्षिकचा लाभ मिळू शकतो. शेतकरी वर्ग जर अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती मध्ये असेल त्यांना प्रथम प्राधान्य दिला जातोय.
बाकीच्या इतर सर्व शेतकऱ्यांचा अर्ज लॉटरी पद्धतीने जाहीर केला जातो याबद्दलची प्रत्येक अपडेट आपले कृषी सेवक यांच्याकडून मिळतो.रब्बी हंगामाच्या बियाणे अनुदानाबाबत अजून सविस्तर माहिती मिळवण्यासाठी कृषी अधिकारी यांना संपर्क साधा .
या रब्बी हंगामातील बियाणे अनुदान मिळवण्यासाठी महा-डीबीटी पोर्टल वर लवकरच अर्ज सादर करा.हा लेखा इतर मित्रांना नक्की पाठवा .