50,000 रु.प्रोत्साहन योजनेच्या जाचक अट रद्द ! लाखो शेतकऱ्यांना दिलासा | protsahan anudan yojana maharashtra

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना” प्रोत्साहन”
नमस्कार शेतकरी मित्रांनो , शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनामार्फत प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे, या प्रोत्साहनपर अनुदानासाठी महाराष्ट्र शासनामार्फत २२ जून २०२२ अटी व शर्ती जाहीर करण्यात आले होते. शासनाने जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे बरेच शेतकरी यामध्ये अपात्र ठरल्याचे दिसून येत असल्याने, काही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यामध्ये असलेले जाचक अट रद्द करण्यासाठी शासनाकडे मागणी करत होते.mjpsky.maharastra.gov.in list
बुलढाणा लोकप्रतिनिधी :
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत च्या प्रोत्साहनपर योजनेचा जाचक अट रद्द करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री कडे मागणी केलेले होते त्यांनी केलेल्या या मागणीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ते निर्णय देऊन प्रोत्साहनपर अनुदानाचे अटी व शर्ती मध्ये बदल करण्यात आले आहे.50 हजार अनुदान यादी pdf
२२ जून २०२२ च्या अटी व शर्ती :
या दिवसाच्या मंत्रिमंडळाच्या निकषाप्रमाणे सन २०१७ ते २०१९-२० या कालावधीमध्ये कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मागील तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची परिस्थिती पाहता मोजकेच शेतकरी पात्र ठरत असल्याचे चित्र दिसत होते, याच गोष्टीचा विचार करून लोकप्रतिनिधी आमदार संजय गायकवाड यांनी मुख्यमंत्री कडे अट रद्द करण्याबाबत मागणी केले होते.biyane anudan yojana
नवीन शासन निर्णय :
माननीय मुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घेत लोकप्रतिनिधी केलेले मागणी मान्य करत मूळ निर्णय रद्द केल्याची माहिती २९ ऑक्टोंबर २०२२ रोजी
प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहेत. सन २०१७ ते २०१९-२० या तीन वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये नियमित कर्ज परतफेडीची अट रद्द करून
कोणतेही २ वर्षांमध्ये नियमित्त कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले योजना अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय
घेण्यात आला आहे अशीही माहिती आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली शासनाच्या या महत्त्वपूर्ण
आदेशामुळे बुलढाणा जिल्हासह राज्यातील लाखो शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.50,000 anudan yojana maharashtra list