50,000 रु.प्रोत्साहन अनुदान दुसरी व तिसरी यादी जाहीर,चेक करा नांव | Protsahan Anudan Second list Declared

mjpsky.maharashtra.gov.in list :-
नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे . याची पहिली यादी ही जाहीर केले त्या यादीमध्ये जे शेतकरी आधार प्रमाणीकरण केले असे राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण २५०० रुपये वितरित केले गेले आहे अशा प्रकारे एकाच वेळी खात्यात थेट रक्कम जमा करणारे देशात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे .
५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दुसरी यादी :
राज्यातील एकूण पात्र लाभार्थी पैकी पहिली यादी ही ८ लाख ३० हजार शेतकर्याची प्रसिद्ध करण्यात आली आजून बरेच सारे लाभार्थ्या यामध्ये पात्र आहेत परंतु त्यांचे पहिले यादी मध्ये नाव नाहीत आणि अश्या लाभार्थ्यांना आता उत्कंठा लागलेली आज अखेर ती पूर्ण झाली ही योजना एकूण तीन टप्प्यांमध्ये ही योजना राबवली जाईल अशा प्रकारे माहिती देण्यात आली आणि याचा अंतर्गत दुसरी यादी ही २४ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर झालं आहे .
५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान आता पर्यतचा विवरण :
५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान साठी ४७०० कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आलेला आहे त्यापैकी ३ हजार कोटी रुपये शासन निर्णय GR काढून त्या वित्तलेखाच्या खाली वितरित करण्यात आलेले आहेत .आणि त्यापैकी २५०० कोटी रुपये वितरण आता पर्यत झालेलं आहे .अद्याप देखील २२ कोटी निधी शासनाकडून मंजूर झालेले निधीपैकी शिल्लक आहे. त्याच्यामुळे आता लवकरच दुसरी ही यादी मधील पात्र शेतकरी झालेल्या लाभार्थ्यांना ही ५०००० रु.प्रोत्साहन पर अनुदान दिलं जाणार .
E-Kyc (आधार प्रमाणीकरण ) :
- E-Kyc साठी आपले सरकार सेवा केंद्र येथे जावा
- आधार कार्ड
- कर्ज खात्याचे व बचत खात्याचे पासबूक
- यादीमध्ये आपल्या नावासमोरील नमूद असलेला विशिष्ट क्रमांक(यादीत शोधून घ्या )