PMMVY या महिलांना ५००० रु.या योजनेतून ,जाणून घ्या संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Matru Vandana Yojana
Pradhan Mantri Matru Vandana Yojana :-
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना केंद्र सरकारच्या केंद्रीय महिला बाल विकास विभाग अंतर्गत राबविला जातो.या योजनेअंतर्गत महिलांना ५००० रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेसाठी कोण पात्र ? योजनेची अटी व शर्ती या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नव्या स्वरूपात लागू २०२३ :-
केंद्रीय महिला बाल विकास विभागाच्या दिनांक १४ जुलै २०२२ च्या मिशन शक्ती मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा पुणे यांचे दिनांक १९ मे २०२३ च्या नियमानुसार राज्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नवीन अटी शर्ती लागू करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे उद्दिष्टे (PMMVY):-
गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना मजुरी कमी झाल्याबद्दल भरपाई प्रदान करणे आणि त्यांना योग्य विश्रांती आणि पोषण सुनिश्चित करणे या कालावधीमध्ये यांची आरोग्य स्थिती सुधारणे याकरिता रोख प्रोत्साहन द्वारे अल्पपोषणाचा प्रभाव कमी करणे.जेणेकरून पहिल्या बाळाच्या जन्मापूर्वी गरोदर मातांना पुरेशी विश्रांती योग्य आरोग्य सांभाळण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशा करिता केंद्र सरकार मार्फत आर्थिक साह्य केले जाते.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana:- फायदे
योजनेचा लाभ (पहिल्या बाळाच्या) गर्भवती व स्तनदा मातांना योजनेचा लाभ मिळतो. योजनेचे लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी (DBT) द्वारे पाठवले जाते.
लाभ कधी मिळतो ?
- योजनेचा पहिला हप्ता गरोदरपणाचा नोंदणीच्या वेळी १००० रु.
- दुसरा हप्ता गरोदरपणा नंतर सहा महिन्यानंतर होणाऱ्या तपासणीनंतर २००० रु.
- तिसरा हप्ता ज्यामध्ये २००० रुपये हे बाळाच्या जन्म नोंदणी केली जाते,तसेच जन्म झालेल्या मुलाला बीसीजी ओपीव्ही, डीपीटी व इतर लसी दिल्यानंतर दिले जाते
योजनेचा लाभ दोन टप्प्यात दिले जाते यामध्ये पहिल्या टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येत,जर दुसरे अपत्य ही मुलगी झाल्यास सकारात्मक वर्तणूक व्हावे याकरिता एकाच टप्प्यात ६००० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाते. या योजनेचा लाभ वेतनासह मातृत्व रजा मिळवणाऱ्या महिला तसेच कायद्याने कोणतेही समान लाभ मिळत असलेल्या महिला याचे लाभ मिळणार नाही. एखाद्या लाभार्थी महिला दुसऱ्या खेपच्या वेळी जुळी किंवा तीळ मुलांना जन्म दिल्यास किंवा अधिक मुली असतील तरीदेखील या योजनेस ती महिला पात्र राहणार. Pradhan Mantri Matru Vandana Yojana
आवश्यक ते कागदपत्रे :-
- पात्र लाभार्थी महिला चे कुटुंब चे उत्पन्न रुपये ०८ लाख पेक्षा कमी असावे
- बीपीएल शिधापत्रिका धारक महिला (PMMVY)
- अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या महिला
- पात्र लाभार्थी महिला ४०% किंवा पूर्णत्व दिव्यांग असल्यास
- आयुष्मान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी
- मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या तसेच शेतकरी महिला Pradhan Mantri Matru Vandana Yojana
- गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर
वरील पैकी एक कागदपत्रे लाभार्थी महिलांकडे असणे आवश्यक तसेच खाली दिलेले कागदपत्रे
- आधार कार्ड
- माता आणि बाल संरक्षण कार्ड
- आधार एनपीसीला लिंक असलेले बँक पासबुक खाते
- बाळाचे जन्म प्रमाणपत्र
- आर सी एच नोंदणी क्रमांक देणे आवश्यक
- लाभार्थी महिला मोबाईल क्रमांक
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज आणि कसा करावा :-
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील आशा वर्कर/ अंगणवाडी सेविका किंवा जवळील कार्यक्षेत्रांमधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी संपर्क करावा.
ही योजना केंद्र शासनाच्या अधीन असल्यामुळे योजनेमध्ये बदल होतात यांच्यामार्फत पात्र झालेल्या लाभार्थी महिलांना केंद्र शासनाच्या माध्यमातून डीबीटीद्वारे रक्कम जमा केली जाते.Pradhan Mantri Matru Vandana Yojana २०२३
मित्रांनो हा महत्त्वपूर्ण पोस्ट आपल्याला जर आवडला असेल मित्रांना नक्की शेअर करा
सौजन्य : samaveshitshikshan.com