Pradhan Mantri Fasal Bima Yojana List : –
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक पेरणी करताना, हंगामाच्या मध्य कालामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे आणि पिकाच्या काढणी अगोदर असे एकूण पाच वेगवेगळ्या टप्प्यावर शेती पिकाच्या संरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. पिकाच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंत एकूण पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या नुस्कानाची भरपाई शेतकऱ्यांना कंपनीमार्फत दिले जाते.
अशा पद्धतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना, ई-पीक पाहणी, शेतामधील पिकांची पीक विमा काढणे असे आवश्यक त्या गोष्टी अगोदर करावे लागतील,महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून यावर्षीपासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना फक्त एक रुपये मिळतोय.
Pik Vima :-
फक्त एक रुपया मध्ये पिक विमा योजनेचा लाभ मिळतोय याचा गैरफायदा कोणी घेऊ नये याकरिता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या समय सूचकता दाखवून योग्य वेळी पीक विमा चे सर्व फॉर्म छाननी करण्याचे आदेश कृषी आयुक्ता मार्फत राज्यातील सर्व विमा कंपन्यांना दिले आहेत.यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना केवळ पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा मार्ग सुखकर झाला आहे. राज्यातील कृषी आयुक्तामार्फत विमा कंपन्यांना पिक विमा संदर्भात ३१ ऑगस्ट २०२३ रोजी पत्र दिले असून त्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अपात्र शेतकरी :-
- एका शेतकऱ्यांच्या जमिनीवर परस्पर दुसऱ्या शेतकऱ्यांनी किंवा व्यक्तीने विमा काढणे,
- सिंचन विभाग,वनविभाग,विद्युत महामंडळ,औद्योगिक क्षेत्र इत्यादी शासकीय जमिनीवर विमा काढणे,
- नगरपालिका महान,गरपालिकेतील अकृषक क्षेत्रावर विमा काढणे
- मंदिर,मज्जिद इत्यादी धार्मिक स्थळांच्या जमिनीवर विमा काढणे
- काही सार्वजनिक संस्थेच्या जमिनीवर विमा काढणे pik Vima
- ७/१२ तसेच ८अ वरील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा काढणे
- अधिसूचित पिकांची लागवड नसतानाही त्या पिकाची विमा काढणे
- बोगस भाडेकरार दर्शवून दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर विमा काढणे
- सामायिक क्षेत्रावर इतरांची संमती नसताना परस्पर विमा उतरवणे,
- एकाचं बँक खात्यावर अनेक शेतकऱ्यांचे विमा काढणे
असे गैरप्रकार करणारा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळणार नाही अशा अर्जावर कडक कारवाई करण्याचे आदेश.
पिक विमा ऑनलाईन पोर्टल :-
पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने पीक विमा कंपनी शेतकरी यांना एक ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिला आहे याच्या माध्यमातून शेतकरी आपले शेताचे क्षेत्र स्वतः नोंद करून पिक विमा काढतो प्राप्त अर्जाची ऑनलाईन पद्धतीने छाननी होऊन नियम व अटीत न बसणारे अर्ज रद्द केली जातात. नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या पिकांचे काढणीपूर्वी जर नुकसान झाले तर शेतकऱ्याच्या माध्यमातून कंपनीला कळवले जाते कंपनीचा प्रतिनिधी येऊन पिकांची सद्यस्थिती ऑनलाइन पद्धतीने रिपोर्ट केल्यानंतर शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचे हिश्याचे पैसे कंपनीला वर्ग केले जातात अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ऑनलाइन पासून रिपोर्ट करून पिक विमा मिळतो.
Pik Vima Maharashtra :-
राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना मध्ये एकूण ०१ कोटी ७१ लाख शेतकऱ्याने अर्ज केलेले आहेत. त्यामधून ११३.२६ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे असे एकूण विम्याचे रक्कम ८०१५ कोटी आहे.यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा ४७८३ कोटी इतकी आहे तर केंद्र शासनाचा हिस्सा ३२२१ कोटी आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवळ एक रुपया मध्ये १.७१ कोटी रक्कम प्राप्त झाले.
पिक विमा मिळवण्यासाठी काय करावे?
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पिक विमा भरलेला असाल सध्या पडत असलेल्या पावसामुळे तुमचा पीक खराब होत असेल क्रॉप इन्शुरन्स या मोबाईलच्या माध्यमातून क्रॉप कम्प्लीट करू शकता कंपनीचा प्रतिनिधी येऊन पंचनामा केल्यानंतर तुमच्या नुस्कारांच्या टक्केवारी प्रमाणे तुम्हाला पिक विमा प्राप्त होतो.