Pm Kusum Solar Pump Yojana Apply Online | पीएम कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरू |

Pm Kusum Solar Pump Yojana Apply Online :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाऊर्जामार्फत राज्यातील महाकृषी अभियान पीएम कुसुम घटक-ब योजनेच्या पुढील टप्प्या अंतर्गत सौर कृषी पंपा करिता शेतकऱ्यांना महाऊर्जेच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल दिनांक १७ मे २०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या पात्रतेनुसार ३.५ Hp ते ७.५Hp डीसी क्षमतेचा पारेषण विहिरीत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येतात.याचं पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा किती ?आवश्यक पात्रता काय ? याबद्दलची संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.
Pm Kusum Solar Pump Yojana :-
महाऊर्जामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्याचा आव्हान करण्यात येत आहे.महा ऊर्जामार्फत जिल्हा निहाय उपलब्ध करून दिलेल्या कोटाचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर हा पोर्टल बंद करण्यात येणार असल्याची माहिती महाऊर्जाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. योजनेसंबंधी इतर सर्व माहिती www.mahaurja.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रथम शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर भेट देऊन योजनेसंबंधीतील सर्व अटी व शर्ती याबाबत अभ्यास करून ऑनलाईन अर्ज भरावे.solar pump yojana
कुसुम सोलर कृषिपंपकरिता ऑनलाईन अर्ज
👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
कुसुम सोलर योजना : –
शेतकरी मित्रांनो सद्यस्थितीला ही संकेतस्थळ चालू आहे पण त्यावर रिडायरेक्ट केल्यानंतर डायरेक्ट यूजर आयडी आणि पासवर्ड मागितला जात आहे.
त्यावरून असं लक्षात येते की या संकेतस्थळावर अजून कामकाज चालू आहे. वेबसाईटची कामकाज पूर्ण झाल्यानंतर केव्हाही हे संकेतस्थळ चालू होईल.
संकेतस्थळ सुरळीत चालू झाल्यानंतर आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून आपणास अपडेट देण्यात येईल.जर आपल्या जिल्ह्यात पीएम कुसुम सौर कृषी पंप योजना-ब अंतर्गत कोटा उपलब्ध असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा.या महत्वपूर्ण योजनेचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो वेबसाईट सुरळीत चालू झाल्यानंतर होईल
तेवढे लवकर अर्ज भरण्याचा प्रयत्न करा.उपलब्ध कोटा इतके अर्ज प्राप्त झाल्यानंतर हा पोर्टल बंद करण्यात येणार आहे याची नोंद घ्या.
पोर्टल बंद झाल्यानंतर ना आपणास कुठेही अर्ज सादर करता येत नाही.solar yojana