Pm Kisan Status Check Aadhar Card : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनामार्फत दिनांक ०१ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली.या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये तीन समान हफ्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात.या योजनेमध्ये राज्य सरकारचा भर घालणाऱी नमो शेतकरी महा सन्मान योजना चा पहिला हप्ताही येणाऱ्या Pm Kisan योजनेच्या चौदाव्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना प्राप्त होणार आहे.
त्याआधी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे कामे करावे लागणार त्यामध्ये ई-के.वाय.सी ,आधार लिंकिंग, Land Seeding Correction इत्यादी ,पीएम किसान च्या ID मध्ये अद्यावत करणे आवश्यक आहे .या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत १९ जून २०२३ रोजी एक महत्त्वाचा प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आला होता. तरी पण अनेक शेतकरी आजुन हे गोष्ट जास्त मनावर घेतले नाहीत.अजून एकदा शेतकऱ्यांना लक्षात आणून देण्याकरिता कृषी आयुक्तालय शिवाजीनगर पुणे यांच्या मार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना बाबत पत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे.या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत .
Pm Kisan Beneficiary Status :-
कृषी आयुक्तालय मार्फत राज्यातील सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मार्क करण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत.शासनाने हे निर्णय Pm Kisan Yojana राबविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी घेतला.राज्यात सध्या Pm Kisan योजनेच्या संदर्भात असलेल्या शेतकऱ्यांचे समस्याचे निरसन करण्याचे काम चालू आहे .त्यामध्ये E-Kyc व बँक खाते आधार(NPCI SEEDED )संलग्न करणे काम चालू आहे. कृषी विभागामार्फत गाव पातळीवर शेतकऱ्यांना आपल्या पी एम किसान च्या अटीची पूर्तता करण्यास जागृती केली जाते तरीही बरेचशे शेतकऱ्यांना संपर्क करूनही त्यांनी ई केवायसी आणि आपले बँक खाते क्रमांक आधार संलग्न केलेले नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना NPCI AADHAR SEEDING :-
आता अशा शेतकऱ्यांची शासन दप्तरी नोंद घेऊन पीएम किसान पोर्टलवर अपात्र मार्क करण्याची सूचना देण्यात आले आहेत. जे शेतकरी हे काम वेळेत करत नाही अशा शेतकऱ्यांचा Pm Kisan Yojanaअपात्र नक्की होणार.वरील काम वेळेत न झाल्यास पी एम किसान योजनेचा १४ वा हप्ता येण्यास अडचणी येत असल्याकारणाने पी एम किसान पोर्टल वर हे मार्क केले जाणार त्याचबरोबर मयत लाभार्थ्यांना माहे एप्रिल ते जून कालावधीतील १४ वा हप्ता लाभ आधा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्याकरिता २६ जून २६ पर्यंत सर्व कारवाई पूर्ण करण्यास शासनाचा आदेश दिले आहेत.
शेतकरी मित्रांनो त्याकरिता आपले बेनिफिश्री स्टेटस चेक करा.त्यामध्ये कोणते घटक अपूर्ण आहे पहा ते काम वेळेत पूर्ण करा तरचं पी एम किसान योजना १४वा हप्ता मिळणार आहे .
कृषी आयुक्तालय पुणे,
पीएम किसान योजनेबाबतचा पत्र
👉🏿येथे क्लिक पहा 👈🏿