Pm किसान योजना,आधार सेडिंग-NO,ई-KYC-NO, येथे होईल प्रॉब्लेम ओके | PM Kisan Correction Online 2023
PM Kisan Correction Online 2023 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १४ वा हप्ता येत्या आठवडाभरात येण्याची शक्यता आहे .येणार्या हप्ता मध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजना चा पहिला हप्ता पात्र शेतकर्यांना मिळणार आहे .या दोन्ही योजनेची लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी एखादा आपले पीएम किसान योजना बेंनीफिशरी स्टेटस चेक करावे .त्या मध्ये काही त्रुटी आहेत ते वेळेत दुरूस्ती करून घ्यावेत .तरचं पुढील १४ वा हप्ता मिळणार आहे .
महसूल विभागाच्या माहितीनुसार Pm Kisan Yojana 14th installment आणि Namo Shetkari Samman Nidhi Yojana Frist installment पासून खूप शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे .राज्यातील एक कोटी १७ लाख तीन हजार ८८९ शेतकर्यांनी पीएम किसान योजनेसाठी नाव नोंदणी केलेत .त्यापैकी ९७ लाख ७४ हजार ४३० शेतकरी योजनेस पात्र ठरले आहेत .
योजनेच्या निकषा बदल केल्याने राज्यात पात्र केलेले एकूण शेतकरी ७१ लाख चार हजार ४८४ इतकी आहे .शेतकर्यांनी वेळेत आधार सेडिंग आणि E-kyc नाही केले तर राज्यभरातील सुमारे तीन लाख १४ हजार शेतकरी या दोन्ही हप्ताच्या लाभ पासून वंचित राहणार आहेत .
PM Kisan Correction Online : –
योजनेच्या लाभा पासून पात्र शेतकरी वंचित राहू नये म्हणून महसूल विभाग मार्फत ज्या शेतकर्याचे pm kisan yojana च्या आधार सेंडिग पेंडिग
(Adhaar Bank Account Seeding Status:- No) तसेच e-KYC Status :- NO आहे .अश्या शेतकर्याच्या यादी कृषि अधिकारी
यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आली आहे .काही ठिकाणी गाव पातळी वर हे यादी ग्रामपंचायत या ठिकाणी ढक वण्यात आले आहे .
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
शेतकरी मित्रांनो प्रथमता पीएम किसान Beneficiary status चेक करा .
PM Kisan Yojana Beneficiary Status मधील महत्वाचे मुद्दे :
- Beneficiary Status मधील पर्याय मध्ये Payment Mode पर्याय चेक करा .
- या ठिकाणी जर तुम्हाला Payment Mode जर Aadhar दिसत असेल .तर
- आपले pm kisan yojana चे २००० रु ,हप्ता जे बँक खाते क्रमांक आधार NPCI ला लिंक आहे .त्या बँक खातेत जमा झाले असणार .
- पण Payment Mode : Account असं जर दिसत असेल तर आपले पैसे जे ०१ हप्ता ते १३ वा हप्ता पर्यत ज्या बँक खातेत जमा होत होते त्याचं बँक खातेत जमा होणार .
उदा : –
- वरील शेतकर्याच्या Beneficiary Status मध्ये Adhaar Bank Account Seeding Status:- No दाखवत आहे ,
- यांना एक तर पोस्ट ऑफिस २५० रुपये देऊन खाते काढव लागेल .
- अगोदर ज्या बँक खाते मध्ये योजना निधि जमा होत होता ते बँक खात आधार NPCI लिंक कारव लागेल .
१३ वा हप्ता मिळालं नाही का ?
कारण असा चेक करा !
Aadhar Linking Status With Bank :
मित्रानो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत शेतकऱ्यांना जी काही अनुदान आज काल दिले जात आहे हे सर्व अनुदान DBT च्या माध्यमातून जमा केले जात आहे, जे काही योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा बँक खाते क्रमांक आधार NPCI संकेत स्थळाला लिंक आहे त्याच बँक खाते मध्ये पैसे जमा केले जातात. आता PM KISAN YOJANA चा १३ वा हप्ता आधारशी लिंक असलेल्या खात्यामध्ये केंद्र शासनाने जमा केला आहे.
महत्वाचे टीप : आधार NPCI कोणती बँक खाते क्रमांक लिंक आहे हे पाहण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डची लिंक करणे आवश्यक आहे.
असं चेक करा Aadhar Bank Linking Status :
- आधार UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळ ओपन करा .
- https://uidai.gov.in/
- वरील संकेतस्थळ मध्ये My Aadhar मधील Check Aadhar/ Bank Linking Status या पर्याय वर क्लिक करा .
- त्या ठिकाणी आधार क्रमांक टाकून ,Captcha code टाका .
- Send Otp वरती क्लिक करा .
- आधार लिंक मोबाइल क्रमांक वर OTP जाईल .ते ६ अंकी असेल .
- खलील बॉक्स मध्ये OTP टाकून Submit बटन वर क्लिक करा .
- नवीन पेज ओपन होईल आणि त्या मध्ये आधार कार्ड शी लिंक असलेल बँक खाते दिसेल .
- ज्या बँक खाते क्रमांक या ठिकाणी दर्शवेल त्या बँकेत जाऊन चेक करा .
शेतकरी मित्रांनो वरी दाखवल्या प्रमाणे सगळे ओके असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे . त्या साठी के-वाय-सी आजून केलं नसेल तर करा , आधार NPCI आपले बँक खात लिंक करा किंवा पोस्ट बँक आपले खात उघडा ,वरील सर्व बाबी वेळेत पूर्ण करा म्हणजे हप्ता येण्यास मार्ग मोकळा होईल .
१३ वा हप्ता मिळालं नाही का ?
हे चेक करा !
पोस्ट आवडलं असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा ,