“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना “सुरू,शेतकर्यांना ‘मे’ महिन्यात ४००० रु.मिळणार ! Pm Kisan 14th Installment

Pm Kisan 14th Installment :-
‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राज्यात नेमकं कधी लागू होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून होतं.शेतकरी मित्रांनो ही प्रतीक्षा आता संपणार लवकरच महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे दोन निधी एकाच वेळी त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.केंद्र सरकार देशामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे.या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६०००रुपये इतके आर्थिक मदत दिली जाते.दर चार महिन्याच्या अंतराने २००० रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. महाराष्ट्रात आता पी एम किसान सन्मान निधी योजने बरोबर महाराष्ट्र शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत या दोन्ही योजनेचे वार्षिक १२००० रुपये मिळणार आहेत.
केंद्र शासनचा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून राबविले जाणारा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चा पहिला हप्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा आर्थिक मदत केली जाते त्याच प्रमाणे राज्य शासनाकडूनही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.या दोन्ही योजनेच्या माध्यमातून राज्यातील प्रति शेतकरी कुटुंबाला वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत.या योजनेसाठी राज्यातील जे
शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस पात्र ठरणार आहेत.
Namo Shetkari Samman Nidhi Yojana :
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना,
पात्रता,कागदपत्रे ,योजना काय ?
👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्रमाणेच राज्य सरकार देखील नमो शेतकरी महा सन्मान योजना राज्यात राबवत आहे.या योजनेचे निधी आपणास प्राप्त करून घ्यायचे असल्यास केवायसी करणे आवश्यक आहे.Pm Kisan 14th Installment
पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यां नोंदणीला जोडला जाणार डिजिटल सातबारा :-
राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेणारा सर्व शेतकऱ्यांच्या नावासोबत आता डिजिटल उतारा जोडले जाणार आहे.
याचे कामकाज पुणे मुख्यालयातून सुरू असून हे काम लवकरच शासनामार्फत पूर्ण केले जाणार आहे योजनेस पात्र नसूनही योजने
अंतर्गत निधी उचललेल्या अपात्र लाभार्थी कडून आता शासनामार्फत वसुली केली जात आहे .अशा लाभार्थ्यांना महसूल विभागामार्फत नोटिशा पाठवण्यात येत आहे.
राज्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर होणारा अंमलबजावणी :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र शासन कडून राबवली जात असून त्याच धर्तीवर राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवले जात आहे .मे महिन्यापासून या दोन्ही योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे .पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचे लाभ मिळणार आहे.
केंद्र शासन व राज्य शासन निधी येणार खात्यावर :-
राज्यातील जिल्हा प्रशासनाकडून पी एम किसान योजनेचे जे पात्र लाभार्थी यादी शासनाकडे मागविण्यात आले आहे . हे पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजने अंतर्गत निधी प्राप्त होणार.Pm Kisan 14th Installment