जुने फेरफार काढा ऑनलाईन मोबाईल वरून | Old Ferfar Online Download

How Do I Find My Land Old Ferfar Online ?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा फेरफार म्हणजे जमिनीची कुंडली होय, पूर्वजापासून ते आत्तापर्यंत आपल्या शेतजमीनावर किती वेळा बोजा चढला, आणि ते कधी उतरविले, पूर्वी कोणत्या बँकेचा या शेतजमिनीवर बोजा होता, शेतजमीन कोणाकडून खरेदी झाली,या अगोदर जमीन कोणाचे नावे होतं ? अशा एक ना अनेक गोष्टींची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना फक्त जुना फेरफार मध्ये उपलब्ध होतो .

Old Ferfar Online :- 

शेतकरी हेच जुने फेरफार काढण्यासाठी तालुका पातळीवर असलेल्या भूमि अभिलेख कक्ष कडे हेलपाट्या मारत असतो.पण हा पोस्ट जर सविस्तर वाचाआणि  स्वतःच्या मोबाईल वरूनचं आपल्या शेती गटावरील सर्व जुने फेरफार तेही फ्री मध्ये डाऊनलोड करा.तरी हा पोस्ट संपूर्ण वाचा पोस्ट मधील प्रत्येक स्टेप महत्वाचा आहे.

सर्वात जुने फेरफार, तलाठी कार्यालय येथे भेटलेले जुना सर्वे क्रमांक, हिस्सा क्रमांक आपल्याजवळ जर उपलब्ध असेल खाली दिलेला संकेतस्थळावरून सर्वात कमी वेळेत आपले शेत जमिनीचे फेरफार डाऊनलोड करता येतो.महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत ई-रेकॉर्ड्स नवीन संकेतस्थळ शेतकऱ्यांना जुने फेरफार डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

How To Check Satbara Online ? 

या संकेतस्थळावरून आपणास आपल्या शेत जमिनीचे सर्वात जुने उतारे, म्हणजे हस्तलिखित दिले जाणारे पूर्वीचे सात बारा ही उपलब्ध आहेत. हस्तलिखित उताराच्या साह्याने आपल्या शेत जमिनीचा सर्वे क्रमांक, व हिस्सा क्रमांक  प्राप्त होतो. सर्वे क्रमांकाच्या साह्याने जुने फेरफार काढण्यास सोपे जातो.

How Can I  Check My Land Record Online In Maharashtra :-

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा भूमी अभिलेख अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे .  त्या मधला शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शेत जमिनीचा फेरफार, हेच फेरफार ऑनलाइन पद्धतीने कसे डाउनलोड करायचे हे समजून घेण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • भूमी अभिलेखाचा अधिकृत संकेतस्थळ ओपन करा 👉🏿येथे क्लिक करा👈🏿
  • भूमी अभिलेखाचा होमपेज आपणांसमोर ओपन होईल, वापरकर्त्याच्या डाव्या बाजूला “सेवा“, हा टॅब दिसेल.
  • या टॅब मध्ये ई-रेकॉर्ड्स 👉🏿येथे क्लिक करा👈🏿नावावर क्लिक करा
  • आपणांसमोर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र रेवेन्यू डिपार्टमेंट ,नवीन पेजवर रिडायरेक्ट व्हाल.
  • याचं संकेतस्थळावरून आपल्याला जुने फेरफार डाऊनलोड करता येणार आहे.
  • प्रथमता आपल्याला ई रेकॉर्ड होम पेजवर उजव्या भागामध्ये रजिस्ट्रेशन कोणत्या पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती दिलेला आहे.
  • प्रथमता आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन करून घ्यावा लागेल, या ठिकाणी आपलं नाव, राहण्याचा पत्ता,मेल आयडी, मोबाईल नंबर, बर्थ डेट, लॉगिन करण्यासाठी एखादा लॉगिन आयडी बनवून घेणे.उपलब्ध आयडी आपणासमोर दर्शविली जाईल.
  • वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपणास युजर आयडी प्राप्त होईल.
  • ई-रेकॉर्डच्या होमपेज वर डाव्या बाजूला आपणास प्राप्त झालेल्या युजर आयडी पासवर्ड त्या ठिकाणी इंटर करून लॉगिन व्हा.
  • लॉगिन झाल्यानंतर ना कार्यालय, जिल्हा, तालुका,गाव, दस्तावेज नंबर, हे सर्व माहिती या ठिकाणी टाईप करून सर्च या ऑप्शनवर क्लिक करा
  • आपणांसमोर आपल्या शेतजमीचे जुने फेरफार उपलब्ध होतील

Land Record Online In Maharashtra :

शेतकरी मित्रांनो सर्च मेनू च्या बार वर एकूण चार पद्धतीने आपले जुने फेरफार आपणास सर्च करता येतो लॉग इन केल्यानंतर ना संपूर्ण होम पेज एकदा अभ्यासा मग आपल्या शेत जमिनीचे जुने फेरफार हुडकण्यास सुरुवात करा.

शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाचा असलेला हा पोस्ट इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top