Job Card लिस्ट पहा मोबईलवरून व नवीन कार्डसाठी फॉर्म डाऊनलोड करा,NREGA Job Card Download
NREGA Job Card Download :-
नमस्कार मित्रांनो ,ग्रामपंचायत मधील तसेच कृषि विभागातील काही योजना लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड आवश्यकता असते ,मुख्यता ग्रामपंचायतील घरकुल योजना च्या मस्टर साह्याने मंजूरी काढणे ,गोठा प्रकरण ,नरेगा अंतर्गत काम केलेले मजुरी आपल्या खातेत मिळविण्याकरिता ही जॉब लागतो.कृषी विभागातील फलबाग,सिंचन क्षेत्रातील कामे ,अश्या घटकांचे अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी हा कार्ड महत्वाचे आहे.Job Card Download list
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जॉब कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे .शासनाच्या विविध विभागातील योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड आवश्यक आहे.जॉब कार्ड महाराष्ट्र आजच्या पोस्ट मध्ये जॉब कार्ड लिस्ट डाऊनलोड ? , नवीन जॉब कार्डसाठी लागणारे कागदपत्रे कोणते ,त्या नमूना फॉर्म या संदर्भात माहिती पाहणार आहोत तरी पोस्ट संपूर्ण वाचा .
Job Card Download Maharashtra :-
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या कुंटुबना जॉब कार्ड दिला जातो .आपणास ही जॉब कार्ड आवश्यकता असेल तर तुम्ही ग्रामपंचायत मधील रोजगार सेवक मदत घेऊ शकता .घरकुल मंजूर असेल तर तुमच्या कड जॉब कार्ड असणे गरजेचं कारण घरकुल अनुदान बरोबर ,बांधकाम करताना लागणारे मंजूर आपण काम करून रोजगार हमी योजना अंतर्गत मस्टर भरून पैसे काढता येतो . जॉब कार्ड मधील रोजगार म्हणून नोंद करताय त्याचे वय हे १८ वर्षा पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे .
जॉब कार्ड लिस्ट डाऊनलोड करा 👇🏿
- नरेगा चा अधिकृत संकेतस्थळ उघडा 👉🏿https://nrega.nic.in/HomeGP_new.aspx👈🏿
- या ठिकाणी Generate Reports वरती क्लिक करा .
- आपल्या समोर सर्व राज्य नांव दिसतील ,त्या मध्ये महाराष्ट्र वरती क्लिक करा .
- Reports बॉक्स मध्ये आर्थिक वर्ष ,आपले जिल्हा ,तालुका निवडा ,सर्वात शेवटी ग्रामपंचायत निवड करा .
- त्या नंतर Proceed वरती क्लिक करा .
- जॉब कार्ड संबधित संपूर्ण माहिती आपणा समोर ओपन होईल,
- job card registration पर्याया मधील job card /Employment Register या क्लिक करा .(४ नंबर हा पर्याय आहे )
- घरातील किती सदस्य नावे जॉब कार्ड मध्ये आहे हे पहाण्यासाठी Registration Application Register (५ नंबर हा पर्याय आहे )
- क्लिक करा संपूर्ण यादी दिसेल ,यादीमधील नांवा वर क्लिक करून जॉब कार्ड डाउनलोड करू शकता .
जॉब कार्ड काढायचा प्रकिया :-
पुढील लिंक 👉🏿pdf फॉर्म 👈🏿वर क्लिक करून प्रपत्र नमूना ०१ फॉर्म भरून बँकेत सादर करून ,त्यांनी दिलेले पोच आणि प्रपत्र २ ,नमूना ०१ फॉर्म भरून ग्रामपंचायत सादर करून शकता .