Nano DAP Fertilizer Available | शेतकरी मित्रांनो डी.ए.पी मिळणार नॅनो स्वरुपात ,केंद्राची मंजूरी !

Nano DAP Fertilizer Available In India :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,शेतात कोणतेही पीक घेतलं तर त्याला खत तर टाकावे लागणार पण खताचे आज भाव पाहिले असता सर्व सामान्य शेतकर्‍यांना न झेपणारे किमंत आहेत.आजच्या लेखात तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अशी माहिती घेऊन आलो आहे .या लेखातील माहितीचं तुम्हाला नक्की फायदा होणार आहे ,तरी हा लेख पूर्ण वाचा . (Nano DAP)

Nano DAP Fertilizer : – 

आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही शेतकर्‍यांचे हिताचे विचार करतात ते यावरून स्पष्ट होतं की,नुकतचं केंद्र सरकार ने नॅनो डी.ए.पी बनविण्यास भारत सरकार मंजूरी देण्यात आले आहे .या Nano DAP ने शेतकर्‍यांचे जीवन सुकर करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊस आहे .भारतामध्ये खताच्या बाबतीत स्वयंपूर्णातेची आणखी एक मोठी उपलब्धी म्हणावे लागेल .देशात नॅनो युरियानंतर आता भारत सरकारने नॅनो डी.ए.पी मान्यता दिली आहे . Nano DAP  यामुळे शेतकर्‍यांना खूप फायदा होणार आहे .

Nano DAP Fertilisers : – फायदे 

सरकारच्या या निर्णयमुळे देशातील शेतकर्‍यांना आता डीएपी खताच्या पोत्या वाहून नेण्याच्या अडचणीतून त्याची सुटका होणार आहे .नॅनो युरियानंतर आता केंद्र सरकारने नॅनो Nano DAP ला बाजारात उतरण्यास मान्यता दिली आहे .नॅनो डीएपी एक बाटली DAP खताच्या एका पोत्याइतकी प्रभावी असणार .नॅनो डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताला मान्यता देणे हे शेतकर्‍यांचे आर्थिक दृष्ट्या सुकर करण्याचा दिशेने महत्वाचे पाऊस आहे .

  • नॅनो डीएपी शेतकर्‍याचे पैसे बचत होणार
  • नॅनो डीएपी द्रावण स्वरुपात आहे त्यामुळे कमी वेळेत पिका मध्ये रिझल्ट दिसणार
  • कमी किमंत मध्ये महत्वाचे खत उपलब्ध झाल्याने पिकाला आवश्यक त्यावेळी देता येणार

Nano DAP कसे वापरावे & कधी ?  :- 

  • नॅनो डीएपी हे द्रावण स्वरुपात आहे ते सहजतेने वापरता येत
  • नॅनो डीएपी तुम्ही पिकांन वर फवारणी करू शकता
  • पिकाच्या गरजे नुसार आळवणी किंवा फवारणी माध्यमातून देता येणार .
  • द्रावण स्वरुपात असल्याने इतर विद्राव्य खता बरोबर वापरता येणार

नॅनो डीएपी हे द्रावण स्वरुपातील खताला बाजारात लॉच करण्यास अधिकृत मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितले .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top