MahaBudget 2023|शेतकर्‍यांना मिळणार वार्षिक १२००० रुपये ” नमो शेतकरी महासन्मान निधी योजना “

MahaBudget 2023 : 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्याच्या अर्थसंकल्पाला सुरुवात झाली असून त्याची सुरुवातचं शेतकर्‍यांपासून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे .” शाश्वत शेती समृद्ध शेतकरी “सध्या राज्यातील अन्नदाता नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रासला आहे .शाश्वत शेतसाठी शासना मार्फत अनेक उपाय होत असलेतरी शेतकर्‍यांला हक्काची मदतीची हमी आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी मा.पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साखरलेला “प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी ” (पीएम किसान सन्मान निधी योजना) निधी मध्ये राज्य शासनाची अनुदानाची  भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” ची घोषणा उपमुख्यमंत्री यांनी केली

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना : – (काय आहे योजना)

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकर्‍यांना प्रतिवर्षी ६००० रुपये दिलं जात त्यामध्ये आता राज्य सरकारचे “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” ६००० रु. ने भर पडणार आहे .राज्यातील शेतकर्‍यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार माध्यमातून आता वार्षिक १२००० रु. मिळणर आहेत .या (Namo Shetkri Mahasanman Nidhi Yojana) लाभ राज्यातील १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे .एकूणचं “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा  भार हे ६९०० कोटी रु. हे राज्य सरकार उचलणार आहे .

Namo Shetkri Mahasanman Nidhi Yojana :-

या योजने बरोबर शेतकर्‍यांचे  “प्रधानमंत्री पीक विमा योजना “चे पैसेही आता राज्य सरकार भरणार आहे .

या अर्थसंकल्प मध्ये याबाबत विशेष तरतूद करण्यात आली आहे. {नमो शेतकरी महासन्मान निधी योजना} सन २०१६ पासून खरीप पीक विमा किंवा रब्बी पीक विमासाठी  शेतकर्‍यांना विमा हप्ताच्या २ टक्के रक्कम भराव लागत होत पण सरकारच्या नवीन धोरणानुसार आता

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ १ रुपयांत पीक विमा नोंदणी करता येणार आहे .राज्य सरकार पीक विम्याचा संपूर्ण हप्ता भरणार आहे .”प्रधानमंत्री पीक विमा योजना ” साठी ३३१२ कोटी रु.इतका भार राज्य तिजोरी पडणार आहे .

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कोण पात्र ? 

शेतकरी मित्रांनो राज्यातील जेवढे पीएम किसान सन्मान निधी योजना {Pm Kisan Yojana}  पात्र लाभार्थी शेतकरी आहे.

हे सर्व या योजनेस पात्र राहणार आहे . शेतकर्‍यासाठी असलेला हा महत्वपूर्ण महितीचा हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top