शेतकर्‍यांना मिळणार तत्काळ मदत,पंचनामे होणार उपग्रह व ड्रोन साह्याने.मंत्रिमंडळ निर्णय

शेतकर्‍यांना मिळणार तत्काळ मदत : – 

शेतकरी मित्रांनो नमस्कार ,राज्यात सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .सरकार पण आपल्या परीने शेतकर्‍यांना तत्काळ मदत करण्यासाठी मार्ग शोधत आहे .दिनांक २४ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी हे होते यावेळी शेतकर्‍याच्या विविध  विषयीवर चर्चा झाला आहे .या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत .Namo Shetkari Yojana 

अवकळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे बाबत शेतकर्‍याचे तक्रारी येऊ नयेत पिकांचे पंचनामे हे वेळेत व्हावे आणि त्यांना मिळणार मदत वेळेत पोचवा याकडे लक्ष द्यावे तसेच महाराष्टात येत्या जून पासून ई-पंचनामे करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री यांनी संगितले .यामध्ये मानवी हस्तक्षेप टाळून सर्व पंचनामे हे तंत्रज्ञानाच्या साह्याने माहिती गोळा करून मोबाइल द्वारे ई -पंचनामे केली जाईल .शेती पिकांचे पंचनामा मध्ये पारदर्शक येईल आणि शेतकर्‍यांना वेळेत मदत करता येईल असे ही मुख्यमंत्री यांनी संगितले .

नमो शेतकरी महासन्मान निधी : – 

शेतकर्‍यांना वेळेत मदत मिळावी याकरिता सर्वेक्षणात उपग्रह व ड्रोनची मदत घेतून संगणकीय प्रणाली वापरली जाणार. केंद्र सरकार मार्फत दिला जाणार

प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी ” योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी “योजना यांची अंमलबजावणी होणार .

आता राज्यातील शेतकर्‍यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पीक विम्याच्या पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे .

राज्यात खरीप हंगामापासून अवकळी ,गरपीट ,अवेळी पाऊस ,अशा अनेक समस्यांना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागत आहे .

अशा वेळी शेतकर्‍यांना शासनाकडून हक्कांची मदतीची गरज असते.सरकार कडून शाश्वत उपाय योजना होत .असले तरी नैसर्गिक आपतीचे  वेळेत पंचनामे होणे गरजेचे आहे.Namo Shetkari Yojana 

नैसर्गिक आपत्ती अनुदानात वाढ :- 

शासना मार्फत दिला जाणारा नैसर्गिक आपत्तीचे नुकसान भरपाई वाढ करण्यात आली असून आता NDRF च्या दुप्पट दराने शेतकर्‍यांना मदत करण्यात आली आहे . त्याच बरोबर राज्य आपत्ती प्रतिसाद निधिकडून द्यावयाचा मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच तीन हेक्टर मर्यादे पर्यत शेतकर्‍यांना मदत देण्यात येत आहे .अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे .

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी :- 

या बैठकीत विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांच्या परिषदेत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे लोकार्पण करण्यात आले. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना दिवसा देखील वीज उपलब्ध होणार आहे .शेतकर्‍यांच्या समृद्धीसाठी हो योजना राज्यात प्रभावीपणे राबवावी उपमुख्यमंत्री आदेश दिले .

या योजने अंतर्गत सन २०२५ पर्यन्त सर्व जिल्ह्यातील किमान ३० टक्के शेतीच्या वाहिन्या या प्रकल्पद्वारे आणण्याचे उद्दीष्ट आहे

यासाठी राज्य सरकारचे एकूण ३० हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे असे उपमुख्यमंत्री संगितले .

मित्रांनो अशा महत्वाच्या मुद्दयान वर ही बैठक पार पडली ,हा पोस्ट आवडलं असेल मित्रांना नक्की शेअर करा .Namo Shetkari Yojana 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *