शेतकर्यांना मिळणार “नमो” चा पहिला हप्ता या दिवशी नक्की | Namo Shetkari Mahasanman Yojana Frist Installment Date Confirm
Namo Shetkari Mahasanman Yojana Frist Installment Date :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो , राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्याचं तारीख ठरला .शेतकर्यांना या दिवशी नक्की मिळणार निधी ,या मध्ये कोण पात्र ,अपात्र कोण ,महाराष्ट्रातील किती शेतकर्यांना मिळणार पहिला हप्ता या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत तरी लेख पूर्ण वाचा.Agriculture Scheme
Namo Shetkari Yojana :-
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक २६/१०/२०२३ रोजी शिर्डी येथे होणार्या कार्यक्रमात वितरण केलं जाणार आहे.या वेळी राज्याचे मुख्यमंत्रीसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार.देश पातळीवर राबविला जाणारा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत भर घालणारी नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना राज्य शासनाने जाहीर केला.या योजनेच्या पहिल्या हप्ता करिता १ हजार ७२० कोटी रु.निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली होती .
मात्र योजनेच्या निधी वितरणासाठी वापरला जाणार ऑनलाइन प्रणाली होणार चुका ,त्यावरील सुधारणा यामुळे नमो योजनेचा पहिला हप्ता वितरणास विलंब होत होता. Pm Kisan Yojana च्या १४ वा हप्ता प्राप्त शेतकर्यांना Namo Farmer Scheme चा पहिला हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.या योजने अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी पात्र व्हावे या करिता कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवित पुन्हा पडताळणी केली त्यात एकूण ७ लाख ४१ हजार शेतकर्यांची भर पडली आहे .
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना :-
पीएम किसान योजना १४ वा हप्ता राज्यातील ८५.६६ लाखा शेतकर्यांना मिळाला ,मात्र विशेष मोहीम अंतर्गत नवीन अभिलेखानुसार
राज्यातील पात्र लाभार्थीची संख्या ९३.०७ लाख झाली आहे .केंद्राच्या योजनेच्या माध्यमातून ८५.६६ लाख शेतकर्यांन करिता १ हजार ८६६ कोटी ४० लाख रु.वितरित करण्यात आले .राज्य सरकारच्या नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना संख्या किती स्पष्टता सांगता येत नाही .
१६ ऑक्टोबर कृषी विभागा अंतर्गत पात्र लाभार्थी संख्या : –
- पीएम किसान राज्यातील (१४ वा हप्ता प्राप्त लाभार्थी) संख्या : ८५.६६ लाख
- राज्यातील एकूण पात्र लाभार्थी : ९३.७० लाख
- भूमी अभिलेख नोंदी अध्यावत केलेले लाभार्थी :९१.१२ लाख
- अध्यावत प्रलंबित लाभार्थी : १.१५ लाख
- शेतकरी पात्र लाभार्थी बँक खाती आधार संलग्न नसलेले संख्या ५.९८ लाख
- ई-के वायशी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थी : ५.२६ लाख
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा
पहिला हप्ता करिता तुम्ही पात्र आहे का?