Pm किसान योजना & Namo Shetkari योजनेचा पुढील हप्ता या तारखेला ! Namo Shetkari 2nd Installment Date

नमस्कार मित्रांनो,देशातील शेतकर्‍यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वार्षिक ६००० रुपये देण्यात येत,ही योजना सुरू झाल्या पासून १५ हप्ता DBT च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या बँक खाते जमा केलेत.सर्वांना या योजनेचा १६ वा हप्ता कधी या प्रतिक्षेत होते.अश्या शेतकर्‍यासाठी आनंदाची बातमी Pm Kisan Yojana 16th Installment हप्ता हे २८ फेब्रुवारी २०२४ वितरित केलं जाणार आहे .या योजनेच्या धर्तीवरती सुरू केलेलं ” नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता ही येईल का ?. याकडे सर्वांचे लक्ष आहे ज्या दिवशी पी एम किसान योजनेचा १६व्या त्याबाबत नोटीस प्रसिद्ध करण्यात आला त्याचं दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्ता करिता निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Pm Kisan Yojana 16th Installment :-

दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणांना करिता १७९२ कोटी रुपये इतकी निधी ला मान्यता देण्यात आली हा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमधील हप्ता वितरित करण्यासाठी आहे.सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली होती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन ६०००रुपये इतकी भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरुवात करण्यात आली

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना :-

नमो शेतकरी महासन्मान योजना चा पहिला हप्ता माहे एप्रिल ते जून या कालावधीमध्ये निधी वितरित करण्यात आला त्यावेळी १७२० कोटी इतकी निधी वितरित करण्यात आला होता.पहिल्या निधी वितरित झाल्यानंतर दुसरी निधी ही ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये देण्याचे ठरले निधी अभावी रखडलेली योजनेचा दुसरा हप्ता फेब्रुवारी २०२४ मध्ये देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्ता करिता १७९२ कोटी इतकी निधी वितरित करण्यास शासनाचे मान्यता देण्यात आली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top