लाडकी बहीण योजनेच्या नियमात बदल जाणून घ्या.कोणाला कधी मिळणार हप्ता सविस्तर Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Update Government Changed Rules

Mazi Ladki Bahin Yojana Update Government Changed Rules :-
नमस्कार मित्रांनो,सरकारने लाडकी पण योजनेच्या नियमात प्रत्येक वेळी बदल केलेला आहे.या योजनेच्या अपडेट प्रमाणे पात्र लाभार्थी महिला अर्ज करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो बहिणींना या निधीचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे या रक्कमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबतचं आर्थिक उन्नती साधने शक्य होणार.
या योजनेच्या लाभ राज्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून सरकारने या योजनेच्या नियमात अनेक बदल केले आहेत.त्या मधीलचं एक महत्त्वपूर्ण बदलाची माहिती या पोस्टमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. Ladki Bahin Yojana
या बहिणींना मिळणार ४५०० रुपये :-
सरकारच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात पुणे शहरातून झाली १४ ऑगस्ट २०२४ पासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. हे रक्कम जे महिला लाभार्थी ३१ जुलै पूर्वी अर्ज केलेल्या व पात्र लाभार्थ्यांना प्राप्त झाले.सध्या ३१ जुलै पूर्वी अर्ज केलेल्या पात्र महिलांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे रक्कम जमा केले जात आहे.bahin Yojana Maharashtra
अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत आहे ३१ ऑगस्ट पर्यन्त अर्ज दाखल केलेल्या महिलांना देखील सप्टेंबर महिन्यात जुलै,ऑगस्ट, सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे मिळून ४५०० प्राप्त होणार आहेत.
सरकारने नियमात काय बदल केले ?
Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते अगोदरच्या अटीप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे ०५ एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे.त्या कुटुंबातील महिलांना अपात्र ठरविण्यात आले होते. म्हणजे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता.
आता मात्र सरकारने ही अट काढली आहे. त्यामुळे आता पाच एकर पेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे सरकारने कुटुंबाचा उत्पन्न अडीच लाख रुपये पर्यंत मर्यादित कायम ठेवली आहे.दरम्यान सरकारने पाच एकर शेत जमिनीचे अट काढून टाकल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी महिलांना याचा फायदा होऊ शकतो.
हा महत्त्वपूर्ण पोस्ट जर आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.