मोफत 3 गॅस सिलेंडर पैसे पाहिजे तर हे काम लवकर करा ! Mukhyamantri Annapurna yojana 2024 Free Gas

Free Gas Yojana 2024 :-

नमस्कार मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून घोषित केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा महत्वपूर्ण बदलाचा GR शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे. या GR मध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले गॅस सबसिडी चा लाभ कोणाला किती मिळणार यासंदर्भात सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.

Mukhyamantri Annapurna yojana :-

सरकारकडून आपल्या लाडक्या बहिणींना ३ गॅस सिलेंडर वर्षामध्ये मोफत दिले जाणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आला असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास प्रथम गॅस सिलेंडर पैसे देऊन घ्यावे लागेल. त्यानंतर त्या गॅस सिलेंडरची जो काही सबसिडी आहे आपण दिलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्वला गॅस असेल 807 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.Free Gas

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून प्राप्त ठरण्यात आलेल्या लाभार्थी पैकी ०१ जुलै २०२४ पर्यंत शिधापत्रिका नुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांना स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरण केल्यानंतर त्या महिलेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

आपण काय करावे ?

मित्रांनो आपल्याकडे जर उज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी नसेल आपण स्वतः पैसे देऊन कनेक्शन घेतलेला असाल आणि तो गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावे असेल तर ते आपल्या कुटुंबातील महिलेच्या नावे आपणास हस्तांतरण करावे लागेल तरचं आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठराल.

उज्वला योजनेअंतर्गत आपले गॅस जोडणी असेल तर आपण गॅस पासबुकचा E-KYC केलात का ?  त्याचबरोबर आपले बँक खाते चालू स्थितीत आहे की नाही पडताळणी करणे आवश्यक आहे. आपला बँक खाते जर होल्ड वर असेल अथवा E-KYC पेंडिंग असेल तर आपणास या योजनेचा सबसिडी प्राप्त होणार नाही. आपले बँक खाते एकदा तपासणी करून पहा.

हस्तांतरणासाठी लागणारी कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • गॅस कार्ड
  • SV पेपर
  • ID २ फोटो

वरील कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या अधिकृत डीलरशिप संपर्क साधून आपले गॅस  कनेक्शन हस्तांतरण करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. हा महत्वपूर्ण पोस्ट जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *