Aavadel Tithe Pravas Yojana 2023 :-
MSRTC नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत राज्यातील नागरिकांसाठी अनेकदा वेगवेगळ्या प्रवासाच्या योजना आणि उपक्रम सादर करत असतात.त्यामधीलचं एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे “आवडेल तेथे कुठेही प्रवास “ योजना होय.ही योजना MSRTC सन १९८८ पासून प्रवासासाठी राबवत आहे या योजनेअंतर्गत ०७ दिवसाच्या पासप्रमाणे ०४ दिवसाचा पास दिला जातो.या योजनेसाठी सुधारित दर हे दिनांक ०५ जानेवारी २०२३ पासून लागू राहतील. ही योजना प्रवाशासाठी कशी फायदेशीर ठरते,याअंतर्गत प्रवाशांना किती रक्कम भरावे लागतील.या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत.msrtc bus pass online
आवडेल तेथे प्रवास योजना २०२३ :-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत वाहतूक सेवा प्रकारामध्ये,साधी (साधी,जलद, रात्र सेवा, शहरी व यशवंती (मिडी) आंतरराज्यसह तसेच शिवशाही (आसनी)आंतरराज्यसह इत्यादी बस सेवा प्रकारच्या माध्यमातून योजनेचा
लाभ नागरिकांना घेता येणार.msrtc 4 days pass online booking
Aavadel Tithe Pravas Yojana 2023 :-
Aavadel Tithe Pravas 2023 :-
या योजनेअंतर्गत प्रवाशांना वाहतूक सेवा प्रकारानुसार ०७ दिवसाच्या पास चे मूल्य व ०४ दिवसाच्या पास मूल्य वरील दाखवल्याप्रमाणे रक्कम भरावे लागतात .यामध्ये मुख्यता प्रौढ व मुले अशा दोन पद्धतीने प्रवासी मूल्य ठरवण्यात आले आहे.ते मूल्य वरील दाखवलेल्या तक्त्याप्रमाणे,मित्रांनो या योजनेचा लाभ घेत असताना ज्या मुलांचे वय ०५ वर्षापेक्षा जास्त १२ वर्षे पेक्षा कमी वय मर्यादा असलेल्या मुलांसाठी लागू राहणार.
आवडेल तेथे प्रवास योजना २०२३ नियम व अटी :-
- या योजनेअंतर्गत प्रवाशांना ०७ व ०४ दिवसाचे पास दिले जातील.
- साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेस साठी ( ज्यामध्ये साधी,जलद रात्र राणी आणि शहरी यशवंती आंतरराज्यसह मार्गासह ग्राह्य राहील )
- या योजनेत निमआराम बसेस साठी स्वतंत्रदर निश्चित करण्यात आलेली नाहीत.
- शिवशाही बसेस साठी साधी निमआराम, विना वाहतानुकुलीत शयन ,आसनी या सर्व सेवेसाठी आंतरराज्य मार्ग ग्राह्य राहील .
- आवडेल तेथे प्रवास योजना अंतर्गत घेण्यात येणारा पास १० दिवसा अगोदर घेता येते.
- या योजनेअंतर्गत दिलेल्या पास नियमित बसेस सोबतच यात्रेसाठी सोडण्यात आलेले बस करिता ग्राह्य राहील.
- योजनेअंतर्गत दिलेला पास हे पास धारक म्हणून कोणत्याही एसटी बस ना प्रवेश नाकारता येणार नाही.
- योजनेच्या पास धारकांना आसनासाठी हमी देता येत नाही.
- योजनेअंतर्गत प्रौढ प्रासधारकांना ३० किलो व १२ वर्षाखालील मुलाला १५ किलो प्रवासी सामान विनाकार नेता येईल.
- योजनेअंतर्गत प्रवास करत असताना आंतरराज्य प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस जिथे पर्यंत जातो तिथपर्यंत योजनेचा लाभ मिळणार.
- पास धारक लाभार्थी कडून पास हरवल्यास दुसरा पास मिळत नाही तसेच पास चे इतर कोणतेही परतावाही मिळत नाही.
- प्रवाशांकडून पासची गैरवापर केल्यास निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येत .
- आवडेल तेथे पास योजना २०२३ अंतर्गत प्रवाशांचे कोणतेही मौलवान वस्तू हरवल्यास महामंडळ त्याचे जबाबदारी स्वीकारल जात नाही .
- आवडेल तेथे प्रवास योजना अंतर्गत देण्यात येणारा पास चा दिवसा गणना ००.०० ते २४.०० वेळेप्रमाणे करण्यात येईल .
- पासच्या मुदतीच्या अंतिम दिवशी प्रवासी २४.०० वाजेनंतर प्रवास करत असेल त्यापुढील प्रवासाकरिता तिकट घेणे बंधनकारक राहील.
- प्रवास करत असताना मंडळामार्फत काही बस मध्ये बिघाड झाल्यास तसेच पर्याय कारणामुळे नियोजित वेळेत पोहोचण्यास वेळ झाल्यास पासधारकांना प्रवास खंडित झाल्या नसल्याने पाच धारकाकडून वेगळे तिकिटाचे पैसे घेतले जाणार नाही.
- कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक बंद असल्यास योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेळेत प्रवास न झाल्यास पास परतावा परत मिळणार किंवा मुदतवाढ वाहतूक नियमित सुरू झाल्यास तीन महिने पर्यंत कालावधीत प्रवास करता येणार.
मित्रांनो अशा पद्धतीने आवडेल तेथे प्रवास योजना २०२३ अंतर्गत आपण महाराष्ट्रभर सात दिवसाचा किंवा चार दिवसाचा पास काढून प्रवास करू शकता हा महत्त्वपूर्ण योजनेचा पोस्ट जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांना नक्की शेअर करा.
महिला एसटी प्रवासात ५०%सूट