मोफत गणवेश योजना सुरू या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ | Mofat Ganvesh Yojana

Mofat Ganvesh Yojana:-

नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मार्फत ६ जुलै २०२३ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .या मध्ये  शासनाने नेमके कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा या कार्यक्रमांतर्गत

राज्य सरकार मोफत गणवेश योजना २०२३ पासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमधील इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुली आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणेशाचा लाभ देण्यात येतो. पण राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची बाब शासनाचे विचारधन होती.

Free Uniform Yojana 2023 :- 

शासन निर्णय

  • शासकीय तशेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी वर्गातील सर्व मुली अनुसूचित जाती व जमातीचे सर्व मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांची सर्व मुले याचंबरोबर योजनेपासून वंचित राहणार नाही इतर प्रवर्गातील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांकरिता दरवर्षी मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • मोफत गणवेश योजनेप्रमाणे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोड बूट, दोन जोड पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत विद्यार्थ्यांस देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • मोफत गणवेश योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना एक जोड बूट,दोन जोड पायमोजे ,देण्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्षी २०२३-२४  पासून करण्यास सुरू करण्यात येणार असून तसेच सर्व विद्यार्थ्यांना दोन गणवेश उपलब्ध देण्याकरिता प्रती ६०० रुपये प्रमाणे आर्थिक तरतूद एकूण ७५.६० कोटी इतके तरतूद करण्यात आले आहे. एक जोड बूट,दोन जोड पायमोजे ,उपलब्ध करून देण्याकरिता प्रति विद्यार्थी १७० रुपये प्रमाणे ८२.९२ कोटी इतकी निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य पालकांना दिलासा मिळणार आहे .

मोफत गणवेश GR वाचा

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top