“मोदी आवास घरकुल योजना”सर्वासाठी घरे २०२४,समजून घ्या काय आहे योजना | Modi Awas Gharkul Yojana

Modi Awas Gharkul Yojana :-

राज्यातील ग्रामीण भागातील बेघरांना घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविले जातात या अंतर्गत सर्वांसाठी घरे २०२४ हे शासन धोरण असून यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घराच्या स्वरूपात वास्तव्यास असलेल्या सर्व लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावा असा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केलं जात आहे.

राज शासनामार्फत अनुसूचित जमाती,अनुसूचित जाती,रमाई आवास योजना,शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, निमित्त भटक्या जमाती साठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना इत्यादी योजना घरकुलासाठी राज्यामध्ये राबवले जात आहे शासनाचा उद्देश या सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा आहे.

Modi Awas Gharkul Yojana :- 

राज शासनाचा सन २०२३-२४ अर्थसंकल्पामध्ये आवाज प्लस प्रतीक्षा यादी मध्ये नसलेले लाभार्थ्यांसाठी ३ वर्षात १० लाख घरी पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आला आहे या योजनेसाठी मोदी आवास घरकुल योजना या नावाने सुरू करून त्याला राज्य शासनाच्या मान्यता दिली आहे.

मोदी आवास घरकुल योजना काय ?

सन २०१८-१९ मध्ये प्रधानमंत्री आवास प्लस अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुला पासून वंचित असलेल्या सर्व लाभार्थ्यांचा सर्वे मोबाईलच्या माध्यमातून केलेला होता या अंतर्गत आवाज प्लस प्रतीक्षा यादी मध्ये असलेले लाभार्थी आवाज प्लस प्रणालीवर नोंद झाल्याने परंतु ऑटोमॅटिक सिस्टीम द्वारे बरेचसे लाभार्थी रद्द झालेले होते या सर्व लाभार्थ्यांचा जिल्हा निवड समितीकडे शिफारस केलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.Awas Plus Yojana

मोदी आवास घरकुल २०२४ योजनेअंतर्गत राज्यातील नमूद केलेले लाभार्थी व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार यासाठी लाभार्थ्याकडे  २६९ चौरस फूट इतके क्षेत्र बांधकामासाठी जागा असणे आवश्यक.

तालुका निहाय मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्राधान्य क्रमांकानुसार ग्रामसभेमार्फत निवड करून अर्जाची व्यवस्थित छाननी करून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत घरकुल प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे निकषा अंतर्गत निवड केली जाईल.

मोदी आवास घरकुल योजना पात्रता :- 

  • महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
  • लाभार्थी वास्तव आपल्या राज्यामध्ये किमान १५ वर्षे झालेल्या असावे.
  • या योजनेचा लाभ घेणारा लाभार्थ्यांचा वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त नसावे.
  • लाभार्थ्यांचा सद्यस्थितीमध्ये पक्के घर नसावे.
  • लाभार्थी कडे स्वतःचे किंवा शासनाने दिलेले जमीन असणे आवश्यक अथवा सद्यस्थितीत कच्चे घर असलेले ठिकाणी घर बांधता येईल अशी जागा असणे आवश्यक.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने कोणत्याही गृहनिर्माण गृह कर्ज घेतलेला नसावा.
  • कोणत्याही योजनेच्या माध्यमातून घरकुल योजनेस पात्र असलेले लाभार्थी पुन्हा या योजनेस पात्र होत नाही.
  • लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी मध्ये समावेश नसावा.

आवश्यक कागदपत्रे :-

  • सातबारा उतारा
  • ग्रामपंचायत मधील मालमत्ता नमुना आठ मधील नोंदवहीतील उतारा
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • जॉब कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेत खाते पासबुक

 

मित्रांनो सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंक वरील शासन GR वाचा .

मोदी आवास घरकुल योजना

संदर्भात GR

👉🏿येथे क्लिक करा 👈🏿

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top