हरवलेल्या अथवा चोरीला गेलेल्या मोबाईलचं तक्रार असं ऑनलाईन करा ! Mobile Lost Complaint Online Maharashtra

नमस्कार मित्रांनो,आज काल मोबाईल चोरीचे प्रकरण खूप वाढत आहेत.शहरी भागात ज्या ठिकाणी गर्दी जास्त अशा जागी तर हा प्रमाण जास्त आहे आपला मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला तर आपल्या ज्या ठिकाणी घटना झाला तेथील जवळच्या पोलिस स्टेशन रिपोर्ट गरजेचं आहे.आपणास त्या पोलिस ठाणे च्या ठिकाणी जाणे शक्य होत नसेल तर ,या घटनेचा रिपोर्ट ऑनलाइन करू शकता,ऑनलाइन माहिती कशी भरायची या बदल ची संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत .mobile lost how to track with imei number
Mobile Lost Complaint :-
मित्रांनो प्रथमता आपल्याकडे मोबाईल खरेदीचा ओरिजनल पावती असणे आवश्यक आहे, त्यावर मोबाईल संदर्भात संपूर्ण माहिती स्पष्टपणे दिसणारे असावेत. मोबाईल हरवलेला अथवा चोरीला गेलेल्या तक्रारबाबत आपण जर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन तक्रार नोंदवत असाल तर खालील कागदपत्रे सोबत घेऊन जावा.mobile robbery
- ओरिजनल मोबाईल पावती
- व्यक्तीचा आधार कार्ड ( पावती ज्या व्यक्तीच्या नाव)
या दोन कागदपत्रे घेऊन त्यासोबत एक अर्ज जोडा, अर्जामध्ये आपल्या सोबत घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती, ठिकाण, वेळ तारीख, याची नोंद आवश्यक करा.त्याचं बरोबर आपला मोबाईल क्रमांक जो मोबाईल मध्ये होता तोही नोंदवा, पोलिसांना आपल्याशी संपर्क करण्यासाठी चालू एखादा मोबाईल क्रमांक त्या अर्जामध्ये लिहा. मित्रांनो हा झाला ऑफलाईन पद्धत.
ऑनलाइन तक्रार नोंद करण्यासाठी खालील स्टेप वापरा :
https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx
- वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून महाराष्ट्र पोलीस यांच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन व्हा.
- समोर दिसणाऱ्या वेब पेजवरील Create Citizen Login लॉगिन या पर्यावर क्लिक करा.
- तक्रारदार यांनी स्वतःची युजर आयडी व पासवर्ड तयार करून त्या करिता लागणारे सर्व वैयक्तिक माहिती भरून सबमिट करा. त्यानंतर ओ.टी.पी प्राप्त होईल,ओ,टी,पी टाकल्यानंतर आपलं एक सिटीजन यूजर आयडी तयार होईल.
- सिटीजन लॉगिन मध्ये तयार केलेले युजरनेम पासवर्ड टाकून लॉगिन व्हा ( लॉगिन होण्याअगोदर मित्रांनो आपण ज्या भाषेतून तक्रार नोंद करणार आहात ती भाषा निवडा मगचं लॉगिन या पर्यावरण क्लिक करा )
- लॉगिन केल्यानंतर ना आपणास तक्रार टॅब दिसेल त्यावर क्लिक करून नवीन तक्रारीचे तपशील समाविष्ट करा या पर्याय वर क्लिक करा.
- तक्रारदारांचा तपशील या अर्जदाराने स्वतःची माहिती भरा.
- घटनेच्या तपशील मध्ये घडलेल्या घटनेची जागा,प्रकार घटनेची तारीख, वेळ व दिनांक याची नोंद करा.
- घडलेली घटना कोणत्या पोलीस ठाणे हत्तीतील आहे आपणास माहिती असल्यास प्रथम जिल्हा व पोलीस ठाणे निवड करा.
- तक्रारीची तपशील मध्ये मोबाईल अथवा कागदपत्रे हरवल्याची संपूर्ण माहिती भरा.
- संपूर्ण माहिती भरून पूर्ण झाल्यानंतर सादर या बटणावर क्लिक करा.
मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपला मोबाईल व आवश्यक कागदपत्रे हरवलेले अथवा चोरी गेलेले तक्रार सिटीजन लॉगिन च्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस यांना माहिती देऊ शकतो.सायबर च्या माध्यमातून आपला मोबाईल ट्रेकिंग साठी चालू केला जातो.
आपला मोबाईल ट्रॅक झाला की आपल्याशी संपर्क करून आपला मोबाईल दिला जातो. त्यासाठी आपला हरवलेला सिम ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीमध्ये नवीन सिम घेऊन तो नंबर चालू करून घ्या.वरील माहिती जर आपणास उपयुक्त वाटला इतर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद