या महिलांना मिळणार ड्रोन घेण्यासाठी ८ लाख रु.अनुदान | Mahila Bachat Gat Drone Yojana 2024

Mahila Bachat Gat :-

नमस्कार मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाचा २९ नोव्हेंबर २०२३ रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये महिला बचत गटांना ड्रोन पुरणासाठीच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.नेमकं ही योजना कशी राबवली जाणार या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात आपण पुढे पाहणार आहोत.या योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळानी सन २०२४-२५ ते २०२५-२६ या कालावधीसाठी एकूण १२६१ कोटी निधी मंजूर केला आहे.

योजनेच्या सुरुवातीलाच सन २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीसाठी भाड्याने ड्रोन पुरवण्याकरिता १५००० निवडक महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्याचा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे.महिला बचत गटांना सक्षमीकरण करणे आणि कृषी क्षेत्रात ड्रोन सेवा द्वारे नवीन तंत्रज्ञान आणणे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून ही योजना राबविण्यात येणार आहे.

योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये :-

  • ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग,ग्रामीण विकास विभाग आणि खते विभाग,महिला स्वयंसहायता गट आणि प्रमुख खत कंपन्या,यांची संसाधने आणि प्रयत्नांची सांगड घालून करून समग्र चालना देते.
  • विविध राज्यातील अशा क्लस्टर भागांचा निवड करून ज्या ठिकाणी ड्रोन चा वापर आवश्यक आहे अशा ठिकाणी  १५००० महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन पुरवण्यासाठी निवडले जाणार.
  • ड्रोन च्या किमतीच्या 80 ट*क्के इतकी रक्कम केंद्रीय आर्थिक सहाय्य आणि इतर साधने अनुषंगिक शुल्क कमाल आठ लाख रुपये महिला बचत गट ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार आहेत.
  • पात्रता पूर्ण १८ किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला बचत गटाच्या सदस्या पैकी एका सदस्याची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे १५ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी केली जाईल.
  • या प्रशिक्षणामध्ये ०५  दिवसे अनिवार्य ड्रोन पायलेट प्रशिक्षण आणि अतिरिक्त कीटकनाशक फवारणी १० दिवसाची प्रशिक्षणाचा समावेश असेल.
  • स्वयंसहायता गटातील इतर सदस्य किंवा कुटुंबातील सदस्य ज्यांना इलेक्ट्रिकल वस्तूची दुरुस्ती फिटिंग आणि तांत्रिक कामे करण्याची इच्छा आहे त्यांची निवड राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि एलएफसी द्वारे केली जाईल ज्यांना ड्रोन तंत्रज्ञान सहाय्यक म्हणून प्रशिक्षित केली जाईल.
  • हे प्रशिक्षण ड्रोनच्या पुरवठ्यासह पॅकेज म्हणून दिले जाईल.
  • ड्रोन कंपन्याद्वारे खरेदी करण्यात ड्रोन ची दुरुस्ती आणि देखभाल बचत गटांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ड्रोन पुरवठाधारक कंपन्या आणि बचत गट यांच्यातील मदतीस मध्यस्थी म्हणून एलएफसी काम करतील
  • एलएफसी द्वारे नॅनो एरिया नॅनो डीपी यासारख्या नॅनो खतांचा स्वयंसहायता गटासोबत ड्रोन द्वारे वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येतील स्वयंसहायता गट शेतकऱ्यांना नॅनो खतासाठी आणि कीटकनाशकांच्या फवारणीसाठी दोन्ही सेवा भाड्याने देतील.

Drone Yojana 2024 :- 

या ड्रोन चा सर्वात महत्त्वाचा उपयोग शेतकरी गट वर्गाला होणार आहे यामुळे शेतकरी वर्गांचा पिका वरती केला जाणारा फवारणीचा आणि वापरले जाणारा खतावरचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे त्यामुळे ही ड्रोन योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार.

या योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या उपक्रमाद्वारे १५००० बचत गटांना शाश्वत व्यवसाय आणि उपयोगाचा सोय होईल आर्थिक आधार मिळेल आणि ती वार्षिक किमान एक लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतील अशी कल्पना करण्यात आली आहे.

देशातील कृषी क्षेत्रात क्षमता सुधारण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पीक उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतीच्या कामाचा खर्च कमी करण्यासाठी ही योजना शेतकऱ्यांना सहाय्य ठरेल.मित्रांनो हा पोस्ट जर तुम्हाला आवडला असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top