आता MSEDCL कडून सोलर पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरू,फक्त यानाचं लाभ मिळणार | Mahavitran Solar Pump Scheme Online Application Start

Mahavitran Solar Pump Scheme :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास कृषी पंपासाठी वीज पुरवठा उपलब्ध व्हावे या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आली याच्या माध्यमातून महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अजून पर्यंत विद्युत पुरवठा झालेला नाही.अशा शेतकऱ्यांना कृषी सिंचन करण्यासाठी सोलर पंप बसवण्यात आले .त्याच धर्तीवर आता महावितरण कडून सोलर पंप देण्यात येणार आहेत. याकरिताचं महावितरण कंपनीच्या माध्यमातून नवीन पोर्टलची सुरुवात करण्यात आलेली असून या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून अर्ज मागविले जात आहेत.ही सोलर पंप योजना संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने राबविले जाणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण कडून काही अटी व शर्ती आहेत ते आपण या पोस्टमध्ये पुढे पाहणार आहोत.

MSEDCL कृषी सोलर पंप योजना :-

महावितरण च्या माध्यमातून नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले असून योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करता येणार आहे सदर पोस्ट मधील संपूर्ण माहिती वाचूनचं या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे.

महावितरण सोलर पंप योजना पात्रता :-

कुसुम सोलर पंप योजना टप्पा दोनच्या अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने इतके दिवस अर्ज सुरू होते सद्यस्थितीला हे बंद आहे. पण महावितरण कडे नवीन विद्युत जोडणी  घेण्यासाठी अर्ज केलेल्या शेतकरी, जे शेतकरी विजेच्या जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत.महावितरणकडे पैसे भरून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.हे शेतकरीचं पात्र असतील.

शेतकरी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचं आहे तुम्ही जर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलं असेल आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल.हे शक्य नाही  ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याकारणाने तुमचा आधार क्रमांक अगोदरचं या संकेतस्थळावर नोंद असल्याने पुन्हा नोंदणी करता येत नाही.

महावितरण सोलर पंप योजना नोंदणी :-
  • सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ ओपन करा..👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
  • नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल.
  • पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का? Yes बटनावरती क्लिक करा.
  • समोर विचारलेली संपूर्ण माहिती भरून फॉर्म सबमिट करा. तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.
  • यूजर आयडी पासवर्ड भेटल्यानंतर ना कुसुम सोलर पंप योजनेचा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून संपूर्ण फॉर्म सबमिट करावा लागेल.
  • पुढील फॉर्म भरण्यासाठी 👉🏿येथे क्लिक करा👈🏿

 

 

 

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *