Mahatma Phule Jan Arogya Yojana राज्यातील या रेशनकार्ड धारकांना ५ लाख पर्यंत मिळणार लाभ |

Mahatma Phule Jan Arogya Yojana :-

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासना चा महत्त्वपूर्ण योजना “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना”आता राज्यातील सर्व शिधापत्रक धारक तसेच आदिवासी प्रमाणपत्र धारक नागरिकांना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठक २८ जून २०२३ रोजी घेण्यात आला.mjpjay scheme मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य कवच प्राप्त होणार असून या योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण आत्तापर्यंत प्रतिवर्षी १.५ लाख रुपये इतके होते आता यामध्ये वाढ करून ५ लाख रुपये पर्यंत करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ व वैशिष्ट्ये :- 

  • या योजनेचा लाभ राज्यात यापूर्वी केसरी शिधापत्रक धारक व अंत्योदय शिधापत्रक धारक असणारा नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता.मात्र यापुढे राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षण कवच प्राप्त होणार आहे.mahatma phule jan arogya yojana
  • सध्या राज्यात लागू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या एकात्मिक योजनेचे काही बदल करून योजनेचे विस्तारीकरण करून सुधारणा करण्यात आलेले आहेत.mjpjay scheme
  • आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य संरक्षण प्रती कुटुंब ५ लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब ५ लाख रुपये एवढे करण्यात आले आहे

दोन योजना एकच कार्ड :- 

  1. दोन योजनेचे एकचं कार्ड वाटप लवकरच राज्यात सुरू होणार, या दोन्ही योजनेचे एकत्रितपणे अमलबजावणीमुळे दोन्ही योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या उपचारांचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार यामध्ये एखादी योजना पात्र असलेल्या रुग्णालयामध्ये या दोन्ही योजनेचे लाभ लाभार्थ्याला मिळणार.
  2. यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये १२०९ रोगावर उपचार लाभार्थ्यां ना घेता येणार .अशा दोन्ही योजनेचे एकूण १३५६ एवढी उपचारांची संख्या आहे. राज्यात या दोन्ही योजनेचे एकूण १००० रुग्णालयामध्ये लाभार्थ्यांना लाभ घेता येते.
  3. यापूर्वी मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपचारासाठी २.५ लाख रुपये एवढी मर्यादा होती आता ती वाढ करून ४.५ लाख रुपये इतके करण्याचा निर्णय घेण्यात आला.mjpjay scheme
  4. महात्मा फुले जन आरोग्य योजना यादी महाराष्ट्र व कर्नाटक भागात लागू करून सीमेलगेतच्या महाराष्ट्रातील राज्यातील ०८ जिल्ह्यात १४० व कर्नाटक राज्यातील १० अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा मान्यता देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त २०० रुग्णालयांना अंगीकृत करण्यास मनता देण्यात आला आहे.
  5. स्व:बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना शासन निर्णयाच्या तरतुदीमध्ये सुधारणा करून ७४ वरून १८४ इतकी उपचाराची संख्या वाढवण्यात आली उपचार खर्च ३० हजार वरून ०१ लाख रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.mahatma phule insurance scheme
  6. या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजने करण्यात आला आहे राज्यातील भौगोलिक क्षेत्रातील रस्ते अपघात जखमी झालेल्या राज्यातील देशातील रुग्णाचा समावेश करण्यात आला आहे.jyotiba phule medical scheme
मित्रांनो हा महत्त्वाचा पोस्ट तुम्हाला आवडला असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद !

आपला दवाखाना योजना माहिती

👉🏿येथे क्लिक पहा 👈🏿

 

 

 

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *