Maharashtra Gov New Portal :-
नमस्कार मित्रांनो ,आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे अँड्रॉइड मोबाईल आहे.राज्य शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती बांधावरील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध मोबाईल ॲप, संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यामध्ये अजून एका संकेतस्थळाचा भर यामध्ये झाली आहे.ती कोणत्या संकेतस्थळ,याबद्दल सविस्तर माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.Mahadbt Portal
शेतकरी मित्रांनो एकाचचं संकेतस्थळावर शासनाच्या सर्व योजनेची माहिती आपणास उपलब्ध होणार आहे यामध्ये प्रशासन,कुटुंब ,शिक्षण ,कृषी ,उद्योग ,पर्यटन ,या प्रत्येक प्रमुख घटकांमधील जे उपघटक आहेत त्या उपघटकाची सविस्तर माहिती या पोर्टलवर उपलब्ध आहे. हे संकेतस्थळ मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे.
Gov New Portal :-
या ठिकाणी पहिला मुखपृष्ठावर वेबसाईट ची माहिती आहे आपत्कालीन राज्यसेवा, शासनाच्या माध्यमातून नागरिकांना देणारे सेवा, शासन निर्णय असे प्रमुख मुद्द्यांचे टॅब उपलब्ध आहेत.
सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला म्हणजे शासन निर्णय या टॅबच्या अंतर्गत प्रत्येक विभागानुसार शासन निर्णय यामध्ये दर्शविलेले आहेत. शासन निर्णय या मुख्य टॅबमध्ये मंत्रिमंडळाचे निर्णय कोणते आहेत, प्रत्येक दिवशी घेतले जाणारे शासन निर्णय, सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,
प्रशासन मध्ये काम करणारा प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या माध्यमातून सार्वजनिक सुट्ट्या किती आहेत, ई पुस्तक, कायदे नियम मासिक लेख महाआयटी चे धोरण या सर्व गोष्टी एकाच संकेतस्थळावर आता उपलब्ध आहेत.
यापुढे कोणतीही योजनेची माहिती घेण्यास वेगवेगळे संकेतस्थळ ओपन करायची गरज नाही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तो अधिकृत संकेतस्थळ आपण पाहू शकता.
👇👇👇👇