Mahakhanij Transport Registration | वाळू वाहतूक करण्यासाठी वाहन नोंदणी सुरू,असं करा ऑनलाईन नोंदणी
Mahakhanij Transport Registration : –
नमस्कार मित्रांनो,राज्यात नवीन रेती वाळू धोरण लागू करण्यात आलेला आहे .या अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना आता ६०० रुपये प्रतिब्रास वाळू उपलब्ध होणार,या नवीन धोरणानुसार वाळूची सर्व प्रक्रिया हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.नागरिकांना वाळू खरे*दी करण्यासाठी ही ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक,नोंदणी करताना त्या व्यक्तीचे आधार कार्ड हे आवश्यक आहे.sand booking online maharashtra
त्याचप्रमाणे शासनाने उपलब्ध करून दिलेल्या वाळू डेपो पासून नागरिकांच्या घरापर्यंत वाळू पोच करण्यासाठी वाहनाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करणे सुरू आहे. ज्या वाहनाची ऑनलाईन नोंदणी केली जाते त्याच वाहनाच्या माध्यमातून हे वाळू वाहतूक करता येणार,आजच्या या लेखामध्ये वाळू वाहतूक करण्यासाठी वाहनाची नोंदणी ऑनलाइन कशी करायची याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी हा लेख पूर्णपणे वाचा,
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
Mahakhanij Registration : –
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरामध्ये वाळू उपलब्ध करून देण्यासाठी नवीन रेती वाळू धोरण राबविला जात आहे .
याच्यामध्ये ६०० रुपये प्रति ब्रास वाळू (१३३ रुपये मेट्रिक टन) वाळू वि.क्रि दर निश्चित करण्यात आलेला आहे .
पण यामध्ये जो वाहतुकीचा खर्च आहे .तो नागरिकांना करावा लागणार आहे.
परंतु शासनाच्या डेपो पासून नागरिकांच्या घरापर्यंत वाहतुकी करण्यासाठी नेमके कोणते वाहन वापरावे हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.
परंतु हे वाळू वाहतूक करण्यासाठी ज्या वाहनाची नोंदणी https://mahakhanij.maharashtra.gov.in/ ज्या संकेतस्थळावर केलेला
असणार त्या वाहनाला GPS असेल तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे जे वाहन त्यामध्ये बसतील तेच वाहनाच्या माध्यमातून वाहतूक करता येणार,राज्यातील असे इच्छुक वाळू वाहतूक वाहन धारकांना आपल्या वाहनाची महा-खनिज संकेतस्थळावर नोंदणी करण्याचा आव्हान शासनामार्फत करण्यात आलेला आहे.
आपल्या वाहनाची नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.