नमस्कार शेतकरी मित्रांनो , राज्य शासनाच्या माध्यमातून एक शेतकरी एक फॉर्म अंतर्गत महा-डीबीटी पोर्टलवर विविध घटकांना अर्ज करता येतो ,त्या मध्ये कृषि यांत्रिकीकरण ,सिंचन साधने व सुविधा ,बियाणे औषधे व खते ,फलोत्पादन ,छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना (मागेल त्याला अंतर्गत घटक) या मुख्य घटकातील विविध बाबींचा लाभ शेतकर्यांना मिळत असतो .
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत अनेक शेतकरी अर्ज केले असतील त्यांच्या साठी हा पोस्ट महात्वाचं ठरणार आहे .तुम्ही फॉर्म भरल्या दिवसा पासून लॉगिन केलं नसेलतर एखादा लॉगिन करून पहा त्यामध्ये तुम्हाला विनर असं दाखवत असेल तर समजा की तुम्हाला लॉटरी लागली आहे .
Mahadbt Farmer Lottery List 2023
MahaDBT लॉटरी प्रसिद्ध करण्यात आली २९ डिसेंबर २०२३ रोजी ,या यादी मध्ये पात्र शेतकर्यांना ०१ जानेवारी २०२४ आणि ०२ जानेवारी २०२४ रोजी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी SMS पाठवले जात आहे .शेतकरी मित्रांनो तुम्हाला एसएमएस प्राप्त झालं नसेल तर एखादा लॉगिन करून पहा.
प्रसिद्ध यामध्ये तुषार सिंचन ,कांदा चाळ,नवीन विहीर ,जुन्या विहिरी दुरूस्ती ,विजेची जोडणी ,नवीन बोरवेल, तार कुपण, शेडनेट ,कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत सर्व बाबी ,इत्यादी घटकांची लॉटरी लागली आहे .
Mahadbt Lottery List
यादी मधील पात्र सर्व लाभार्थी शेतकर्यांना महा-डीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ०७ दिवसाची मुदत देण्यात आली आहे . बर्याच शेतकर्याचा प्रश्न की मला SMS आला नाही .अश्या शेतकर्यांनी पोर्टल लॉगिन करून मी अर्ज केलेल्या बाबी मध्ये पहा.अर्ज स्थिती या ठिकाणी विनर जर दाखवत असेल तर तुम्हाला कागदपत्रे करावे लागणार .
अपलोड करावयाचे कागदपत्रे : –
- जमिनीचा ७/१२ ,८अ
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबूक
- टेस्ट रिपोर्ट
- कास्ट दाखला
वरील कागदपत्रे अपलोड केल्यानंतर लाभार्थी शेतकर्याला पूर्वसंमती पत्र दिलं जात .शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की संमती पत्र मिळाल्या शिवाय कोणतेही वस्तु खरेदी करू नये .
महा-DBT लॉगिन