कृषी यांत्रिकीकरण लॉटरी लागली २०२४ येथे लॉगिन करून पहा | Mahadbt Farmer Lottery
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,महा_Dbt Farmer Scheme च्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत अर्ज केलेल्या,पात्र शेतकर्यांची लॉटरी यादी प्रसिद्ध करण्यात आले.यादीतील शेतकर्यांना SMS प्राप्त होत असून त्यांना पुढील ७ दिवसात ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करावा लागणार आहे.महा-डीबीटी कृषी यांत्रिकीकरण लॉटरी दिनांक १६ जानेवारी २०२४ प्रसिद्ध करण्यात आलं.
Mahadbt Farmer Lottery :-
मित्रांनो,यामध्ये ८ hp ते २०hp पर्यंत अवजार,खरेदी करायचे ज्यांना ट्रॅक्टर खरेदी खरेदी करायचा आहे त्याचा एक कोटेशन अपलोड करावा लागणार आहे. टेस्ट रिपोर्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करू शकता.टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन अपलोड करत असताना टेस्ट रिपोर्ट ची व्हॅलिडीटी तपासणी नक्की करा .
त्याचं बरोबर पासबुक,आधार कार्ड,अपलोड करावी लागतो ट्रॅक्टर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहे. ट्रॅक्टर आपल्या नावावर नसेल आणि कृषी यंत्र अवजाराची जर लॉटरी लागलेली असेल तर आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा किंवा आपल्या नावावरील असेल ते ट्रॅक्टर कागदपत्र आपल्याला ऑनलाइन पद्धतीने प्राथमिक स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत.
हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुमची कागदपत्र तपासणी वर निधी उपलब्ध झाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पूर्वसंमती दिली जाईल,लॉटरी लागलेली घटक खरेदी झाल्यावर पुढील काही दिवसात तुम्हाला अनुदानाची रक्कम जम्मा केली जाईल.
मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जुन्या अनुदानाचे नियमानुसार ट्रॅक्टर,यंत्र अवजारासाठी अनुदान दिले जात ट्रॅक्टर साठी जास्तीत जास्त सव्वा लाख रुपये एवढा अनुदान दिले जात आहे .याच्यामध्ये नवीन GR आलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अद्याप देखील मंजुरी देण्यात आली नाही ती मंजुरी आल्यानंतर ट्रॅक्टर ला पाच लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे .याच्या संदर्भातील देखील काही अपडेट आल्यानंतर ते अपडेट आमच्या वेबसाईट च्या माध्यमातून देण्यात येईल .