“मागेल त्याला योजना ” या मध्ये अर्ज करणार्या सर्व शेतकर्यांना लाभ मिळणार | Magel Tyala Yojana MahaDbt
Magel Tyala Yojana MahaDbt :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता कृषी विभाग मा.धनंजय मुंडे यांचे कडे ही खाते गेली आहे.पाहिल्याचं आढावा बैठकीत काही महत्वाचे आदेश कृषी मंत्री यांनी अधिकार्यांना दिलेत.काही योजना च्या अमलबजावणी मध्ये फेरबदल करण्याचा सूचना दिलेत.जेणे करून शेतकर्याला विविध योजनेच्या माध्यमातून कशी मदत करता येईल या विषयावर ही बैठक झाली.mahadbt या मध्ये घेतलेल्या निर्णया बदल सविस्तर माहिती पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
MahaDbt Agriculture :-
राज्यातील शेतकऱ्यांना महाडीबीटी माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या निवड करताना लॉटरी पद्धत ही सध्या वापरली जाते.पण राज्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यामते ही लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे.
जे शेतकरी अर्ज करतील योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा तरचं शासनाचा “मागेल त्याला योजना” लाभ घेण्याचा उद्देश यशस्वी होईल.
मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन अशा योजनेचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा या योजनेची निवड प्रक्रियेची कालावधी कमी असावी त्याचबरोबर निवड प्रक्रिया ही सोपी करावे असे सूचना कृषिमंत्री यांनी दिले.
Magel Tyala Yojana MahaDbt :-
खरीप हंगाम २०२३ कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले “एका रुपया भरून शेतकऱ्यांना पिक विमा ” योजनेत सहभागी होता येणार आहे.शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य शासनावर भरणार आहे त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या प्रतीक्षा न करता लवकर पिक विमा अर्ज भरावे .
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १४ वा हप्ता २८ जुलै २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरण केल्या जाणार असल्यामुळे राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान योजना पहिला हप्ता देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश ही मंत्र्यांनी दिलेत.नमो शेतकरी महा-सन्मान निधी योजना राज्य शासन सहा हजार रुपये देणार आहे.
केंद्र व राज्याचे असे दोन्हीही मिळून प्रति शेतकरी वार्षिक रित्या १२००० रुपये प्राप्त होणार ज्यामध्ये राज्याच्या हिशेचे खरीप हंगामापूर्वी तीन रब्बी हंगामापूर्वी तीन अशा दोन टप्प्यात देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा विभाग अंतर्गत १३ योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत राबविला जातात.
केंद्र पुरस्कृत योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे जेणेकरून केंद्र शासनाच्या अधिकाधिक निधी राज्याला प्राप्त होऊन शेतकऱ्यांना लाभ देता येणे शक्य होईल. एकूणचं खरीप हंगामातील महत्त्वाचे असणारे पीक विमा योजना, राज्यातील पर्जन्यमान अभ्यास, नमो शेतकरी महा सन्मान योजना बाबतचा प्रस्ताव, अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर ही ही बैठक पार पडली.