Magel Tyala Solar Pump Yojana 2024 आता मागेल त्याला भेटणार सोलर पंप येथे करा ऑनलाईन अर्ज !

मागेल त्याला सौर कृषि पंप योजाना :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांसाठी एक महत्वपूर्ण योजना राबविली जात आहे ते म्हणजे ‘मागेल त्याला सौर कृषि पंप योजना ‘होय. महत्वाचे उद्देश हा की राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रबल व्हावा आणि पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा किमान ८ तास वीज उपलब्ध व्हावा.योजनेचे अर्ज ऑनलाइन स्वरुपात भरावे लागणार .योजने संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्ण वाचा .Magel Tyala Solar Pump Yojana

योजनेचे ठळक वैशिष्ट्ये :-

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना गटाच्या शेतकऱ्यांसाठी १० टक्के रक्कम भरावे लागणार
  • अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी हा हिस्सा फक्त ०५ टक्के असणारMagel Tyala Solar Pump Yojana
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून भरले जाणार
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ Hp पंप मिळणार
  • पाच वर्षाची दुरुस्ती हमी व इन्शुरन्स असेल
  • विज बिलची आणि लोड सीटिंग ची चिंता मिटणार
  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा होणार

लाभार्थी निवडाचे निकष :- 

  • २.५ एकर पर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यांना ३ अशुशक्ती म्हणजेचं ३Hp पंप मिळणार, २.५१  ते ५ एकर पर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५Hp सोलर पंप दिलं जाणार, ५ एकरावरील शेतजमीनधारक असल्यास ७.५ Hp सौर कृषी पंप दिले जाणार.तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची सौर कृषी पंप मागणी केल्यास त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार .
  • राज्यातील वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे,वीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीन धारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरले जाणार.Magel Tyala Solar Pump Yojana
  • ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल,विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे यांची खात्री महावितरण आधारित करण्यात येईल तथापि जलसंधारणाच्या कामाच्या जिरवण्याच्या पाणी साठ्या मधून पाणी उपसा साठी सदर पंप वापरता येणार नाही .
  • अटल सौर कृषी पंप योजना-०१, अटल सौर कृषी पंप योजना -०२  व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेल्या लाभार्थी देखील या योजनेसाठी पात्र असतील.
योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे
  1. जमिनीचा सातबारा उतारा (विहीर,शेततळ,बोरवेल नोंद,उतारा मध्ये एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना -हरकत प्रमाणपत्र रु २००/-बॉड वर  )
  2. आधार कार्ड
  3. बँक पासबुकMagel Tyala Solar Pump Yojana
  4. पासपोर्ट साईज फोटो
  5. अनुसूचित जाती व जमाती लाभार्थी असल्यास जात प्रमाणपत्र

 

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना

अर्ज ऑनलाईन 

👉येथे क्लिक करा👈

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *